शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 06:17 IST

भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली.

नांदेड : स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. परंतु आजही शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे देशात शेतकऱ्यांचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे हातात गुलाबी झेंडा घ्या अन् शेतकऱ्यांचे सरकार आणा. दोन वर्षांत महाराष्ट्रासह देशात झगमगाट दिसून येईल, असे म्हणत अब की बार किसान सरकार, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली. यावेळी केसीआर म्हणाले, ७५ वर्षांत देशात अनेक सरकारे आली. परंतु आजही पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर दररोज शेतकरी आत्महत्या होतात याचे दु:ख आहे. देशाचे पंतप्रधान संसदेत मोठ-मोठी भाषणे करतात. परंतु दिल्लीत अनेक महिने शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात साडेसातशे जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याबद्दल मोदी एक शब्दही बोलले नाहीत. या सभेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहमदनगर, गडचिरोलीसह अनेक भागातील माजी आमदार, जिल्हा परिषद, न. प. सदस्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. 

भारतात दरवर्षी साधारणत: १ लाख ४० हजार टीएमसी पाऊस होतो.  अर्ध्या पाण्याचे बाष्पीभवन होते. जवळपास ७० ते ७५ हजार टीएमसी पाणी नद्यांमध्ये वाहते. त्यातील फक्त २० हजार टीएमसी पाण्याचा आपण उपयोग करतो, असेही केसीआर म्हणाले.

शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखावीदेशात ७५ वर्षांपैकी जवळपास ६० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस आणि भाजपचे सरकार आहे. परंतु कुणीही आले तरी भाषणबाजी, कोणी किती खाल्ले, अदानी-अंबाणीच्या जवळचा कोण? हीच चर्चा होते. देशातील शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी एकत्र या, गुलाबी झेंडा हाती घ्या अन् आपली ताकद दाखवून किसान सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण हाेऊ देणार नाहीलोकांना भीती घालून खासगीकरणाचा घाट घातला जात आहे; परंतु बीआरएस जनहिताच्या एलआयसी, वीज वितरणसारख्या कंपन्यांचे कधीही खासगीकरण होऊ देणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा यांचे राष्ट्रीयीकरण केले जाईल, असे केसीआर सभेनंतर पत्रपरिषदेत म्हणाले.

 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडPoliticsराजकारण