शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना आजपासून एबी फॉर्मचे वाटप; उमेदवारांची होणार दमछाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:01 IST

युती आणि आघाडीच्या चर्चेमुळे तसेच बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यामुळे निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीही सोमवारी आणि मंगळवारी टप्प्याटप्प्याने जाहीर होतील.

दीपक भातुसे -

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पक्षांतील आघाडी आणि युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आघाडी आणि युतीत ज्या जागांवर सहमती झाली आहे, अशा जागांसाठी ए आणि बी फॉर्म वितरित करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. उमेदवारांच्या हातात आता सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने त्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी दमछाक होणार आहे.

युती आणि आघाडीच्या चर्चेमुळे तसेच बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यामुळे निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीही सोमवारी आणि मंगळवारी टप्प्याटप्प्याने जाहीर होतील.

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपत आहे.

अर्ज भरायला तयार राहा, उमेदवारांना गेले फोनउद्धवसेना आणि मनसेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केल्याचे समजते. या दोन्ही पक्षांची यादीही सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसचीही मुंबईतील उमेदवारांची यादी तयार असून, तीही सोमवारी जाहीर केली जाणार असली, तरी काही उमेदवारांना फोनवरून अर्ज भरण्यास तयार राहायला सांगितले असल्याचे समजते. दरम्यान, आपने तिसरी यादी रविवारी जाहीर केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nomination Rush: Parties Distribute AB Forms, Candidates Face Tight Deadline

Web Summary : Political parties begin distributing AB forms for municipal elections, intensifying the nomination process. Candidates face a tight deadline to submit documents before the Tuesday deadline. Major parties will release candidate lists, adding to the pressure.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६