शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘आरे’ ‘आरे’ मेट्रो! मेट्रो-३च्या कारशेडसाठी विकास आराखड्यात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 05:04 IST

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी राज्य सरकारने विकास आराखडा २०३४च्या मसुद्यामध्ये बदल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व आरेमधील रहिवाशांनी गुरुवारी न्यायालयाला दिली. यापूर्वी हिरवा पट्टा म्हणून राखीव असलेले आरे आता कारशेडसाठी राखीव असल्याचे मसुद्यात दाखविण्यात आले आहे, असे रहिवाशांनी न्यायालयाला सांगितले.

मुंबई : मेट्रो-३ च्या कारशेडसाठी राज्य सरकारने विकास आराखडा २०३४च्या मसुद्यामध्ये बदल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व आरेमधील रहिवाशांनी गुरुवारी न्यायालयाला दिली. यापूर्वी हिरवा पट्टा म्हणून राखीव असलेले आरे आता कारशेडसाठी राखीव असल्याचे मसुद्यात दाखविण्यात आले आहे, असे रहिवाशांनी न्यायालयाला सांगितले.आरे कॉलनीमधील २५ हेल्टर जागा मेट्रो-३ च्या कारशेडसाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते झोरू बाथेना व आरेतील काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. संबंधित ठिकाण हे ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. विकास आराखडा २०३४ च्या मसुद्यातही हे ठिकाण हरित पट्टा व ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून दाखविण्यात आले आहे. मात्र, सरकारने परिपत्रक काढून ही जागा कारशेडसाठी राखीव असल्याचे म्हटले आहे, असे याचिकेत नमूद आहे.गुरुवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकारने विकास आराखडा २०३४ मध्ये या जागेसंबंधी सुधारणा करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. त्यानुसार राज्य सरकारने आरेतील जागा कारशेडसाठी राखीव ठेवली आहे. राज्य सरकार फसवणूक करत असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले.ंपुढील सुनावणी २० मार्चलाकारशेडच्या बांधकामामुळे आरेतील हरित पट्टा नष्ट होईल व पार्यवरणाचे मोठे नुकसान होईल, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यावर न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. पी. डी. नाईक यांनी याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देत याचिकेवरील सुनावणी २० मार्च रोजी ठेवली आहे.

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबई