शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 22:08 IST

मुरुमाच्या टिप्परने घेतला अड्याळच्या तरुणाचा बळी, घटनास्थळी ग्रामस्थांचा रोष : सोमनाळा-विरली मार्गावर घडला भीषण अपघात

अड्याळ ( जि. भंडारा)  : मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत अड्याळ येथील २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या मित्राचे दोन्ही पाय निकामी झाले. शुभम चंद्रशेखर हटवार रा. मंढईपेठ असे मृताचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव वेदांत राजू करंजेकर रा. मंढईपेठ अड्याळ असे आहे. त्याच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही घटना सोमवार २ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सोमनाळा-विरली खंदार मार्गावर घडला. शुभम आणि वेदांत हे दोघेही लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे परीक्षेचा पेपर द्यायला गेले होते. परीक्षा आटोपून दुचाकीने अड्याळ परत येत होते. दरम्यान अड्याळहून ४ किमी अंतरावरील सोमनाळा-विरली खंदार मार्गावर मुरूमाची अवैध वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक एमएच ३६ एए ३८७६ येत होता. या टिप्परने शुभमच्या दुचाकीला समोरा समोर घडक दिली. या घटनेत दुचाकीसह शुभम व वेदांत टिप्परमध्ये सापडले. यात शुभमचा जागीच मृत्यू झाला. तर वेदांतचे दोन्ही पाय निकामी झाले. जखमी झालेल्या वेदांतला प्राथमिक उपचारानंतर भंडारा येथे हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी जमावअपघात झाल्यानंतर टिप्परचालक तिथून पसार झाला. विशेष म्हणजे घटनेनंतर टिप्परही रस्त्याच्या खाली उतरला. अपघाताची माहिती मिळताच अड्याळ येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळ गाठले. तसेच विविध मागण्यांची जोपर्यंत पुर्तता होत नाही तोपर्यंत मृतदेह बाहेर काढणार नाही, अशी भूमिका घेतली. परिणामी घटनास्थळी वातावरण तापले होते.

मुरूमाची अवैध वाहतूकविरली खंदार परिसरातून मोठ्या प्रमाणात अड्याळ मार्गावर मुरूमाची अवैध वाहतूक होत असते. यापुर्वीही तीन अपघात घडले असून यात तिघांचा मृत्यू झाला. आज घडलेल्या घटनेने ग्रामस्थ अधिकच संतापले. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळेच सातत्याने अपघात घडत असून मुरूमाच्या अवैध वाहतुकीला केवळ महसूल विभाग दोषी असल्याचे म्हटले.

अशा आहेत मागण्यामृत पावलेल्या शुभमच्या कुटुंबाला ४० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेदांतच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचल करून आर्थिक मदत द्यावी, घटनास्थळी टिप्पर मालकाला हजर करावे, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेहाची उचल करू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. वृत्त लिहिपर्यंत घटनास्थळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनासह पोलिसांचा फौजफाटा तिथेच होता.

...अन् कुटुंबियाने फोडला हंबरडाशुभम हा आई-वडिलांना एकूलता आहे. अपघातातील दुर्दैवी मृत्यूने हटवार कुटुंबियावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शुभमचे कुटुंब पोहोचताच त्याचे कलेवर पाहून कुटुंबियाने हंबरडा फोडला.

टॅग्स :Accidentअपघात