शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाराज कडूंना अभय देण्यासाठी गोड भेट; बच्चूभाऊंसाठी विधेयकाचा असाही 'सहकार'

By यदू जोशी | Updated: February 27, 2024 08:16 IST

बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद कायम राहावे, यासाठी चक्क सहकार कायद्यातील तरतूदच बदलली जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

 - यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : या - ना त्या कारणाने नाराज असलेले माजी मंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद कायम राहावे, यासाठी चक्क सहकार कायद्यातील तरतूदच बदलली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानसभेत सोमवारी यासंबंधीचे एक विधेयक सादर करण्यात आले.

मविआचे सरकार असताना बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. मात्र, राज्यात सत्तांतर झाले अन् बच्चूभाऊंनी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला. मात्र, त्यांना मंत्रिपद काही मिळाले नाही. नंतर ते अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. खरंतर या बँकेत बहुमत काँग्रेसचे होते. माजी मंत्री यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप आणि बबलू देशमुख या तीन काँग्रेस नेत्यांच्या हातात बँक होती. विधेयकाचे समर्थन करताना सरकारने सहकारी संस्थांमधील राजकीय अस्थिरता संपावी म्हणून हा निर्णय घेत असल्याचे कारण दिले.

... तोपर्यंत अध्यक्षपदावर राहता येईल

  • ऑक्टोबर २०२५ मध्ये बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होईल तोवर बच्चूभाऊंना अध्यक्षपदावर राहता येईल.
  • राज्यात मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या कडूंना बँकेचे अध्यक्ष म्हणून दोन वर्षापर्यंत कायम राहता यावे म्हणून ही गोड भेट दिली जात असल्याची चर्चा आहे.
  • सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अविश्वासाची सहा महिन्यांची मुदत एक वर्षे करण्याची सूचना केली होती, पण ती दोन वर्षे करण्याचा निरोप वरून आला अशीही चर्चा आहे.सहकारातील सुधारणांमुळे होणार मदत
  • बच्चू कडू यांच्याकडे आठ, तर काँग्रेसकडे: १३ मते होती, पण तरीही कडू जिंकले, त्यांनी काँग्रेसची तीन मते फोडली. उपाध्यक्षपदी कडूंसोबतचे अभिजित ढेपे जिंकले, बँक पहिल्यांदाच काँग्रेसच्या हातून गेली. 
  • आता पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांनी कडू, 3 ढेपे यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावर आणण्याच्या हालचाली सुरू केल्या असतानाच सहकार कायद्याच्या ७३ (१ ड) कलमातील सुधारणा कडू यांच्या मदतीला धावून जाणार आहे.
  • या कलमात अशी तरतूद आहे की, सहकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांविरुद्ध ते निवडून आल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. २४ जून २०२३ रोजी कडू अध्यक्ष झाले होते. त्यामुळे कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणता येऊ शकतो. 

मात्र, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सोमवारी विधानसभेत जे सुधारणा विधेयक मांडले त्यात राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या (सहकारी बँकांसह) अध्यक्ष, उपाध्यक्षांवर दोन वर्षापर्यंत अविश्वास आणता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कडू यांच्याप्रमाणेच अन्य काहीजणांनाही दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू