शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात धनगर आरक्षणासाठी आता अभ्यासगटाची स्थापना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:29 IST

मंत्री अतुल सावे यांची विधानसभेत माहिती; योजनांसाठी कृती दल 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुती सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. धनगर समाजाच्या योजना जलदगतीने राबविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘कृती दल’ स्थापन करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत सादर केलेल्या निवेदनात मंत्री सावे म्हणाले की, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड व उत्तर प्रदेश या राज्यांतील अनुसूचित जाती-जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने अवलंबिलेल्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करावयाचा आहे. अभ्यासगटाने मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा या राज्यांचा अभ्यासदौरा केला आहे. उर्वरित राज्यातील अभ्यास करून एकत्रित अहवाल सादर केल्यानंतर अहवालातील शिफारशी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासल्या जातील. त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय शासनस्तरावर घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

समितीची घोषणाधनगर समाजासाठी आदिवासी उपयोजनांच्या धर्तीवर १३ योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाचे शिक्षण, घरकूल, वसतिगृह, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना, एमपीएमसी/यूपीएससी परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण इत्यादीचा समावेश आहे.

धनगर समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तिप्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर, धनगर समाजाच्या योजना जलदगतीने राबविण्यासाठी मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली ‘कृती दल’ स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण