शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

४,५०० किमी लांबीच्या एक्स्प्रेस वेचे उभारणार जाळे, ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस वे ग्रीड’ प्रकल्प राबविण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 12:17 IST

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही पुणे- औरंगाबाद, सुरत- चेन्नई, दिल्ली- मुंबई आदी राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असून, हे मार्ग राज्यातून जात असल्याने काही जिल्हे जोडले जाणार आहेत.

मुंबई : राज्यात तब्बल साडेचार हजार किलोमीटर लांबीचे द्रुतगती महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, यातील काही नव्या महामार्गाची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे.  राज्यातील पायाभूत सुविधा अधिक भक्कम करत, सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. एकीकडे मेट्रो, रस्ते, रेल्वेमार्गाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यावर भर दिला जात असतानाच, सरकारने आता सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्याची आखणी सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस वे ग्रीड प्रकल्पा’ची आखणी करण्यात आली आहे.

२,२०० किमी लांबीचे महामार्ग...-   राज्य रस्ते विकास महामंडळाला आणखी २,२०० किलोमीटर लांबीच्या महामार्गांची सुसाध्यता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -   त्यामध्ये बदलापूर- शिरुर- बीड- लातूर(राज्य सीमेपर्यंत), कोल्हापूर-सोलापूर- लातूर- नांदेड-यवतमाळ-नागपूर, तसेच नाशिक-धुळे- जळगाव- अमरावती-नागपूर, औरंगाबाद- जळगाव, उमरेड-चंद्रपूर(राज्य सीमेपर्यंत), धुळे-नंदूरबार (राज्य सीमेपर्यंत) द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे. -   यातील काही मार्ग सध्या राज्यमार्ग म्हणून असून, काही नव्याने आखणी करण्यात येणार आहेत. -   त्याचप्रमाणे, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही पुणे- औरंगाबाद, सुरत- चेन्नई, दिल्ली- मुंबई आदी राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असून, हे मार्ग राज्यातून जात असल्याने काही जिल्हे जोडले जाणार आहेत.

१ लाख १२ हजार कोटींच्या निधीची गरज -   ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस वे ग्रीड’ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राथमिक अंदाजानुसार, किमान एक लाख बारा हजार कोटींच्या निधीची गरज भासणार असून, त्यातील काही भार केंद्र आणि राज्य सरकार तर उर्वरित निधी एमएसआरडीसी उभारणार आहे. -   राज्यभरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेऊन, त्याला गती देण्यासाठी मंत्रालयात ‘वॉररूम’ गठीत करण्यात आला आहे. -   राज्यात ९४ किमी लांबीच्या मुंबई-पुणे आणि ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने काही जिल्हे जोडण्यात आले आहेत, तर जालना- नांदेड, नागपूर- गोंदिया, गोंदिया- गडचिरोली, गडचिरोली- नागपूर, तसेच ३१७ किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग, विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग अशा १,१७६ किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाचे नियोजन पूर्ण झाले असून, काही महामार्गाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र एक्स्प्रेसवे ग्रीडच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्याची सरकारची योजना असून, नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार, राज्य रस्ते विकास मंडळाने काम सुरू केले आहे.- राधेश्याम मोपलवार, वॉररूमचे महासंचालक 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे