शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा शेतकऱ्याची थट्टा; व्यापाऱ्याला प्रशासनाचा दणका

By appasaheb.patil | Updated: February 27, 2023 08:00 IST

दोन रुपयांचा दिला चेक : १५ दिवसांसाठी परवाना रद्द

- अप्पासाहेब पाटीललोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : १० पोते कांदा विकल्यावर सर्व खर्च वजा जाता फक्त २ रुपयांची पट्टी निघाली तीही रोख न देता पुढील तारखेचा चेक दिला. अशा पध्दतीने शेतकऱ्याची क्रूर थट्टा करणाऱ्या व्यापाऱ्यावर बाजारसमितीने  कारवाई केली आहे. त्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सी.ए. बिराजदार यांनी दिली. 

अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते. खर्च वजा जाता केवळ दोन रुपये ४९ पैसे इतकी पट्टी निघाली.  शेतकऱ्याच्या थट्टेबाबत सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. 

याबाबत बाजार समितीने एक परिपत्रकच काढले असून जे व्यापारी शेतकऱ्यांना रोख पट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर बाजार समितीकडून कारवाई करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

पुढील तारखेचा चेकn१० पिशव्या कांद्याचे वजन ५१२ किलो झाले. विकलेला कांदा, त्याचे वजन आणि भाव पाहता कांद्याचे एकूण ५१२ रुपये झाले. nत्यामधून हमाली ४०.४५ रुपये, तोलाई २४.०६ रुपये, मोटारभाडे १५, रोख उचल ४३० असा खर्च वजा जाता १० पोते कांदे विकल्यावर फक्त २ रुपये ४९ पैसे पट्टी मिळाली. nया पट्टीची चिठ्ठी अन् अडत्याने शेतकऱ्याला दिलेला चेक  सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बाजार समितीने पट्टी रोख न देता चेक दिल्याने कारवाई केली.

टॅग्स :onionकांदा