शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीवर नजर अन् जुन्या-नव्या घोषणांचा गजर; महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 06:45 IST

राज्याच्या विधिमंडळात लोकसभा (लेखा)अनुदान ; मुंबईत लेदर पार्क उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवत उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) मांडताना अनेक जुन्या घोषणांसह काही नवीन घोषणादेखील केल्या. विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटी रु., दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा, देवनार; मुंबई येथे लेदर पार्कची उभारणी, मातंग समाजासाठी ‘आर्टी’ ही संशोधन व प्रशिक्षण संस्था, दिव्यांगांसाठी ३४,४०० घरे आदी घोषणांची पेरणीही त्यांनी केली. 

येत्या चार महिन्यांसाठी मांडलेल्या अर्थसंकल्पात लहान समाजघटकांना सुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण जुन्या घोषणांना नव्याने फोडणी दिल्याचेही दिसते. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांचा उल्लेख नव्याने केलेला दिसतो. विधानपरिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला. 

‘बार्टी’च्या धर्तीवर मातंग समाजासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी, ही समाजाची मागणी पूर्ण झाली. मुस्लिमांच्या मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी योजनेचे अनुदान दोन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये करण्यात आले.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सात हजार किमीची रस्ते, मागेल त्याला सौर पंप, स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात वाढ,  मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प, विमानतळांचा विकास याआधीच्या घोषणाही नव्याने केल्या.

अयोध्या, श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणारnअयोध्या आणि श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येतील. nया भवनांच्या उभारणीसाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

घोषणांची पुन्हा घोषणा‘लेक लाडकी’ योजनेसह अशा अनेक योजनांचा उल्लेख अजित पवार यांच्या भाषणात होता.  ज्यांची घोषणा आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. 

'बार्टी'च्या धर्तीवर 'आर्टी'ची स्थापनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) धर्तीवर मातंग समाजासाठी ‘अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) स्थापन करण्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. याशिवाय मागास घटकांसाठी राज्य सरकारकडून यापूर्वी करण्यात आलेल्या घोषणाचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभागासाठी १८ हजार ८१६ कोटींची तरतूद आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाAjit Pawarअजित पवार