शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये; नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 06:29 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २ हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

मुंबई : शेतकऱ्यांना खूश करणारी बातमी राज्य सरकारने दिली असून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २ हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना घोषित केली होती. केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्षी एका शेतकऱ्यास ६ हजार रुपये अनुदान मिळते. यात राज्याच्या आणखी ६ हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना राबविण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती.

केंद्राचा १५ वा हप्ताही लवकरचकेंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) १५ वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. हे पैसे जमा करण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

पैसे खात्यात कसे येणार?निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आता मिळणारा हा हप्ता कोणता?या योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे  यांनी सांगितले. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.  

खंडकरी पात्र शेतकऱ्यांना जमिनीचे वाटपपात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना एक एकरापेक्षा कमी जमीन वाटप करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. माजी खंडकरी शेतकऱ्यांकडून सातत्याने ही मागणी होत होती.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारDiwaliदिवाळी 2022