शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:23 IST

Morshi Vidhan Sabha Election 2024: मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

प्रदीप भाकरे, अमरावती Maharashtra Assembly Election 2024: जिल्ह्यातील अन्य सात विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत मोर्शी विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय धुरीणांचे सर्वाधिक लक्ष लागले आहे. तेथील विद्यमान आमदारांविरोधात त्यांच्या दुसऱ्याच निवडणुकीत कमालीचा विरोध दिसत असून, महायुतीतील भाजप व राकाँ. (अजित पवार) या मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'? याची उत्सुकता वाढीस लागली आहे.

मोर्शी विधानसभेत सलग दोनदा आमदारकी मिळविण्याचा विक्रम हर्षवर्धन देशमुख व डॉ. अनिल बोंडे यांच्या नावावर आहे. सन १९६२ ते सन २०१९ दरम्यानच्या १३ विधानसभा निवडणुकीत बोंडे व देशमुख वगळता कुणालाही मतदारांनी दुसऱ्यांदा संधी दिली नाही. 

यंदा मोर्शी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना भाजपचे उमेश ऊर्फ चंदू यावलकर व अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांच्याशी झुंज द्यावी लागणार असल्याचे संकेत आहेत.

मोर्शी मतदारसंघात महायुतीतील दोन्ही घटक पक्षांनी आपापले उमेदवार दिल्याने तेथे भाजप व राकाँ. (अजित पवार) या पक्षात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मात्र या मैत्रीपूर्ण लढतीमुळे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार कमालीचे अडचणीत आले आहेत. 

अमित शाहांचे भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी थेट युतीधर्म न पाळता मोर्शीत भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आग्रही आवाहन केले. तर दुसरीकडे अजित पवारदेखील केवळ रोड शो करून निघून गेले. त्यामुळे भुयारांची वाट अधिकच बिकट झाली आहे. 

तिकिटासाठी देवेंद्र भुयारांना करावी लागली भटकंती

वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघाने भाजप उमेदवार रामदास तडस यांना भरभरून मते दिली होती. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे तेथील उमेदवारी भाजपलाच मिळावी, यासाठी आग्रही होते. त्यामुळे देवेंद्र भुयारांना उमेदवारीसाठी मोठी भटकंती करावी लागली.

शेतकरी स्वाभिमान संघटनेला बायबाय करून, बदललेला पक्ष, स्वभावातील आक्रस्ताळेपणा, हर्षवर्धन देशमुखांची सोडलेली साथ या सर्व बाबी भुयारांना मारक ठरल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले मात्र सीट राकाँ (शरदचंद्र पवार) गटाला गेल्याने विक्रम ठाकरे यांनी अपक्ष म्हणून दम ठोकला आहे. त्यांचा फ्रेश व मवाळ चेहरा लोकांना अपील होत असल्याचे निरीक्षण राजकीय निरीक्षकांनी नोंदविले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४morshi-acमोर्शीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Mahayutiमहायुती