शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा हॉलमध्ये फेकला रंगाचा फुगा, उत्तरपत्रिकांवर पसरले शिंतोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 06:41 IST

अचानक घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली.

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना टवाळखोर तरुणांच्या टोळक्याने खिडकीतून रंगाचा फुगा फेकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पेपरवर शिंतोडे उडाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनी तत्काळ परीक्षा कक्षाच्या खिडक्या लावून घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला. ही घटना छावणी परिसरातील लिटिल फ्लाॅवर हायस्कूलमध्ये सोमवारी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान घडली. 

केंद्र संचालकांनी ही बाब शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, बोर्ड सचिव विजय जोशी यांना लगेचच कळविली. त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची सूचना दिली. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवर रंगाचे डाग पडले, त्यात विद्यार्थ्यांचा दोष नाही, असा अहवाल सादर करण्याचे सूचित केले. त्यानुसार केंद्र संचालकांनी तसा अहवाल बोर्ड आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. तरुणांच्या टोळक्याने फुगा फेकला. हे कृत्य एका शिक्षकाने मोबाइलमध्ये कैद केले आहे. तो पुरावा पोलिसांकडे देण्यात येणार आहे. 

टवाळखोरांचा त्रास नेहमीचाच

  • यासंदर्भात केंद्र संचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वर्गात पंखे आहेत; पण पेपर लिहिताना पाने उडतात म्हणून विद्यार्थी पंखे बंद करायला सांगतात. 
  • सूर्यप्रकाश व खेळत्या हवेसाठी सोमवारी परीक्षा कक्षाच्या खिडक्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. 
  • ही संधी साधून टवाळखोरांनी डाव साधला. यापूर्वीही वर्ग सुरू असताना टवाळखोरांनी खिडकीतून दगड फेकला होता. 
  • नशीब बलवत्तर म्हणून एका विद्यार्थिनीच्या डोक्याजवळून हा दगड गेला.

‘मराठी’च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिकाधाराशिव : दहावीच्या परीक्षेत शहरातील एका केंद्रावर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमाची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी समाेर आला. पेपरची वेळ संपल्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांत एकच गाेंधळ उडाला. पहिल्या पाच मिनिटांतच हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांनी परीक्षा हाॅलमधील गुरुजींना कल्पनाही दिली; परंतु त्यांनी दखल घेतली नाही, असा आराेप विद्यार्थ्यांसह पालकांनी केला.

टॅग्स :examपरीक्षाHoliहोळी 2023