शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिकच्या वेळेत बदलामुळे अडचणी वाढणार; माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 07:07 IST

राज्यात दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ बदलली तर माध्यमिकचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

- प्रशांत बिडवेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील शाळांमधील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच स्कूल बसचालक यांच्यासमोरील अडचणींत वाढ होणार आहे.

राज्यात दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ बदलली तर माध्यमिकचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. शाळांतील वर्गखोल्यांअभावी मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचा प्रश्न निर्माण होईल; तसेच माध्यमिक शाळा उशिरा सुटल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात इंग्रजी माध्यमांसह मोठ्या संख्येने शाळा दोन सत्रांत चालतात. त्यात प्राथमिक वर्गाची शाळा सकाळी ९ ते २ या कालावधीत भरवल्यास त्यापुढे माध्यमिक शाळांचे वर्ग केव्हा भरविणार? असा सवाल माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.माध्यमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान उभे राहील. त्यामुळे शाळेची वेळ वाढवावी लागेल आणि त्यानंतर मुला-मुलीना घरी परतण्यास एक ते दीड तासांचा वेळ लागू शकतो. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. 

- सतीश इनामदार, अध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ

ज्या भागात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविणे अशक्य असेल तेथे स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शाळांच्या वेळेबाबत लवचिकता ठेवणे, तसेच निर्णय घेण्याची मुभा शासन निर्णयात देण्यात आली आहे.- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त

टॅग्स :Schoolशाळा