शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा तडाखा; पिके पाण्यात; पश्चिम महाराष्ट्रासह, खान्देश, सातपुडा परिसरात मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:19 IST

वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरुण तर बुलडाणा जिल्ह्यात एक शेतकरी मृत्युमुखी पडला असून, धुळे जिल्ह्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर, अकोला : परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील अकोला जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरुण तर बुलडाणा जिल्ह्यात एक शेतकरी मृत्युमुखी पडला असून, धुळे जिल्ह्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत.कोल्हापूर जिल्ह्याला गेले दोन दिवस पाऊस झोडपून काढत आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने काढणीस आलेली भात, भुईमूग, सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत. हातकणंगले, शिरोळ, करवीर, गगनबावडा तालुक्यात व इचलकरंजी परिसरात धुवाधार पाऊस झाला आहे. 

सातपुडा भागात ढगफुटीअकोला : अकोट,तेल्हारा तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सातपुडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने बोर्डी, कासोद, शिवपूर, शहापूर, हिवरखेड, पिंप्री उमरा, मक्रमपूर आदी गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

विजेचा लोळ पडून युवकाचा मृत्यूसिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. पहाटे अंगावर विजेचा लोळ कोसळल्यामुळे हनुमंत नाना झोरे (२९, रा.सांगेली-गुरगुटवाडी) हा युवक जागीच ठार झाला. तो लघुशंकेसाठी घराच्या बाहेर गेला असता, ही घटना घडली.

धानपीक भुईसपाटगोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून संततधार कायम असून, धानपिकांना फटका बसला आहे. सध्या हलक्या धानाची कापणी सुरू आहे. परंतु पावसामुळे धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने ते पाखड होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात सर्वदूर बीडसह शिरूर, गेवराई, धारूर, माजलगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मंजरसुंबा परिसरात अतिवृष्टी झाली. 

टॅग्स :Rainपाऊस