शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:10 IST

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ईव्ही दुचाकी निर्माण करणारी एथर ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असून याद्वारे सुमारे ४००० रोजगार निर्माण होतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

एथर एनर्जी कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन एमआयडीसीमध्ये १०० एकरावर आपला प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डीएमआयसीमध्ये उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. अधिकाऱ्यांनी जागेचीही पाहणी केली होती. एवढेच नव्हे तर येथील सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली होती.  सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमएआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. एथरचा हा तिसरा उत्पादन प्रकल्प आहे. या कंपनीला हिरो मोटो कॉर्पचे आर्थि पाठबळ आहे. 

एथरचा अत्याधुनिक प्लांट दरवर्षी 1 दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक दोन्ही तयार करणार आहे. समृद्धी द्रुतगती मार्गाद्वारे प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे, गुंतवणूकदार या मराठवाड्याची क्षमता वाढवत आहेत. एथरने मराठवाड्याची केलेली निवड महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

सीएमआयएचा विशेष पाठपुरावाआंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा असलेली लॅण्ड बँक ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये उपलब्ध आहे. यामुळे येथे मोठा अँकर प्रकल्प यावा यासाठी सीएमआयएचे पदाधिकारी दोन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत होते. सीएमआयएने एमजीएममध्ये आयोजित कॉन्फ्रन्ससाठी अथरचे सहसंस्थापक स्वप्निल जैन यांना आमंत्रित केले होते. एवढेच नव्हे तर येथील व्हेंडर साखळी अथरसाठी किती पूरक आहे, हे पटवूनही दिले होते. सीएमआयएने केेलेल्या प्रयत्नांना आता फळ आल्याची चर्चा आता उद्योगजगतात आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरMIDCएमआयडीसी