शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 21:42 IST

सात इच्छुक संस्थांनी माघार घेतल्यानं नाट्यसंमेलनाचं यजमानपद उपराजधानीला

पुणे : 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला  मिळाला आहे. दि. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन रंगणार आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी प्रस्ताव सादर केलेल्या राज्यातील सात इच्छुक संस्था आणि शाखांनी माघार घेतल्यामुळे लातूर व नागपूर या दोन पैकी कुठल्या स्थळावर शिक्कामोर्तब होणार? याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मायभूमी असलेल्या नागपूर या स्थळाला गुरूवारी हिरवा कंदिल दाखविला.आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र पुढील वर्षीचा निवडणुकीचा हंगाम पाहता सात संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतल्यामुळे  केवळ लातूर आणि नागपूर या दोन स्थळांचा विचार होणार आहे. परंतु लातूरमधील दुष्काळाची स्थिती पाहाता ‘नागपूर’लाच संमेलन होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नागपूरवरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाचे वृत्त ’लोकमत’ने दि. 6 डिसेंबर रोजीच प्रसिद्ध केले होते.संमेलन आयोजनाच्या शर्यतीत असलेल्या लातूरकरांनीच दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता  प्रस्ताव मागे घेतल्यामुळे नागपूरकरांना संमेलन आयोजनाचा मान मिळाला असल्याचे समजते. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ही मायभूमी आहे. नागपूरकरांना संमेलनाचा मान मिळाल्यामुळे निवडणुकीच्या हंगामात संमेलनातच राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची संधी चालून आली आहे. यातच मध्यवर्ती नाट्य परिषदेला संमेलनाचा दर्जाही टिकवून ठेवायचा आहे, या दोन्ही गोष्टी या आयोजनातून साध्य होणार असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे, यंदाचे साहित्य आणि नाट्य संमेलन दोन्हीही विदर्भात होत आहे. त्यामुळे साहित्य आणि नाट्य या दोन्हींचा आस्वाद विदर्भवासियांना घेता येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूर