शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

९२ राखीव पीएसआयचे ‘सीआर’ गायब

By admin | Updated: September 19, 2015 23:22 IST

राज्य राखीव दलातील तब्बल ९२ पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गोपनीय अहवालाच्या (सीआर) मूळ नस्त्या (फाइल) पोलीस महासंचालकांना

- जमीर काझी,  मुंबईराज्य राखीव दलातील तब्बल ९२ पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत गोपनीय अहवालाच्या (सीआर) मूळ नस्त्या (फाइल) पोलीस महासंचालकांना मिळेना झाल्या आहेत. कार्यालयीन गलथानपणामुळे बढतीसाठी पात्र असूनही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे पाच वर्षांचे ‘सीआर’ तातडीने घटकप्रमुखाकडून मागविण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या ‘सीआर’च्या मूळ नस्त्या विशेष दूतासमवेत आठ दिवसांमध्ये मुख्यालयात पाठविण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी दिलेले आहेत. ३० सप्टेंबरला ते सेवानिवृत्त होणार असल्याने त्यापूर्वी त्याबाबतचा निर्णय घ्यावयाचा असल्याने ही कार्यवाही तत्परतेने करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांची बढती ही त्यांची सेवा ज्येष्ठतेबरोबरच त्यांची कामगिरी, कार्यपद्धती आणि वरिष्ठांनी दरवर्षीच्या गोपनीय अहवालात त्यांना दिलेले शेरे या बाबींचा विचार केला जातो. नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या घटकांतील प्रशासनाकडे त्याबाबतची माहिती संकलित केली जाते. त्यांच्या घटकप्रमुखांच्या संमतीनंतर त्यांच्या ‘सीआर’ची एक प्रत दरवर्षी पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवावी लागते. मात्र काहींचा अपवाद वगळता प्रशासन विभाग याबाबत फारस्या गांभीर्याने लक्ष देत नाही. प्रशासनाच्या अशाच बेफिकिरीपणाचा फटका ९२ राखीव पोलीस उपनिरीक्षकांना बसला आहे. २०१०-११ ते २०१४-१५पर्यंतच्या त्यांच्या अहवालाची प्रत डीजी आॅफिसकडे उपलब्ध नाही. अधिकारी कार्यरत असलेल्या ठिकाणाहून त्यांच्याकडे ती पाठविण्यात आलेली नाही किंवा पाठवली असली तरी मुख्यालयातील ‘बाबू’नी ती हरविलेली आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी पात्र असूनही त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस मुख्यालयाकडून या ९२ अधिकाऱ्यांची यादी बनविण्यात आलेली असून, ते कार्यरत असलेल्या विविध घटकप्रमुखांकडून ती नव्याने मागवून घेण्यात येणार आहे. त्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. पोलीस महासंचालक संजीय दयाळ येत्या महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे पोलीस मुख्यालयाकडे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. ज्येष्ठतेच्या निकषावर पदोन्नतीसाठी पात्र ठरणाऱ्या मात्र ड्युटीवर कार्यरत असताना विविध गुन्हे अथवा शिस्तभंगाची कारवाई झालेली आहे, अशा १८२ उपनिरीक्षकांचे अहवाल दोन महिन्यांपूर्वी मागविण्यात आले होते. त्यातील पात्र असलेल्यांची प्रलंबित वेतनवाढ, बढती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ९२ राखीव फौजदारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.सीआर मिळत नसलेल्यांमध्ये सर्वाधिक मुंबईचेसीआर मिळत नसलेल्या ९२ राखीव फौजदारांमध्ये सर्वाधिक ९ जण मुंबई, प्रत्येकी पाच जण नागपूर शहर, अकोला, बाभूळगाव व मरोळ प्रशिक्षण केंद्रात (पीटीएस) तर प्रत्येकी ४ अधिकारी नागपूर, नानवीज व सोलापूर पीटीएसमध्ये नियुक्तीला आहेत. त्याशिवाय काही जण खंडाळा, पुणे, नाशिक अकादमी, फोर्सवन व कोल्हापूर आदी ठिकाणी कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.