शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या झळांनी निर्यातीचा मसाला भाजला; उत्पादकांसह निर्यातदार आर्थिक संकटात

By अविनाश कोळी | Updated: March 24, 2026 18:24 IST

आखाती देशातील निर्यात ९० टक्के ठप्प, वर्षाअखेरीस आलेख घटला

अविनाश कोळीसांगली : इराण युद्धाच्या झळांनी अनेक क्षेत्रांना कवेत घेतले असतानाच जगातील सर्वांत मोठा मसाला निर्यातदार देश असलेल्या भारतातील उत्पादक, निर्यातदार चिंतित आहेत. आखाती देशांसह अमेरिकेतील मसाल्यांची ९० टक्के निर्यात ठप्प झाल्याची माहिती निर्यातदारांनी दिली. त्यामुळे उत्पादकांसह निर्यातदार आर्थिक संकटात सापडले आहेत. युद्ध थांबण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय आता त्यांच्या हाती काहीही राहिलेले नाही.स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात १७ लाख ९९ हजार २६७ टन मसाल्यांची निर्यात झाली होती. यात सर्वाधिक मिरची, आले व हळदीची निर्यात होती. २०२५-२६ हे आर्थिक वर्ष संपत असतानाच मसाल्यांच्या निर्यातीचा आलेख झपाट्याने खाली आला. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातही निराशाजनक आकडेवारीने होणार आहे.भारत प्रामुख्याने मिरची, जिरे, मसाला तेल, कढीपत्ता, मिरपूड, कोथिंबीर, बडिशेप, लसूण, पुदिना, मेथी दाणे, ओवा आणि जायफळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर करतो. भारताची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, चीन, यूएई, यूके, व्हिएतनाम, थायलंड, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांना होत असते. अमेरिका, आखाती देश, चीन येथे सर्वाधिक निर्यात होते. यातील अमेरिका व आखाती देशातील निर्यातच ठप्प झाली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाल्याने खर्चाचा भार निर्यातदारांना असह्य झाला आहे.टर्मरिक सिटीतही चिंतागतवर्षी भारतातून १ लाख ७६ हजार ३२५ टन हळदीची निर्यात झाली होती. यंदा त्यात मोठी घट दिसत आहे. टर्मरिक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतही हळदीच्या निर्यातीविषयी चिंता निर्माण झाली आहे. दरवर्षी येथून मोठ्या प्रमाणावर हळद निर्यात होते.

मसाल्याच्या पदार्थांसह केळी, द्राक्ष यांची निर्यात पूर्ण ठप्प झाली आहे. कोरोना काळातही निर्यात सुरू राहिली होती. मात्र, गेल्या काही वर्षांतील निर्यातीचे हे सर्वांत मोठे संकट आहे. - तुकाराम कोरडे, निर्यातदार, पुणे. 

दरवर्षी आखातात मोठ्या प्रमाणावर मसाल्यांची निर्यात होत असते. मात्र, यंदा युद्धामुळे जवळपास सर्व निर्यात ठप्प आहे. उत्पादक व निर्यातदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. युद्ध समाप्तीच्या प्रतीक्षेशिवाय काहीही हाती नाही. - दीप संघवी, निर्यातदार, अहमदाबाद (गुजरात)

English
हिंदी सारांश
Web Title : War Scorches Spice Exports, Indian Producers Face Hardship

Web Summary : Iran war halts 90% of spice exports to US, Gulf. Turmeric City, Sangli, worries. Producers, exporters face financial crisis, await peace.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरSangliसांगली