शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, ‘डीआरआय’ची कारवाई; कॉँग्रेस पदाधिका-यासह बिल्डरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:41 IST

भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपयांच्या तब्बल नऊ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या असून या प्रकरणी पश्चिम उपनगरातील कॉँग्रेसचा

मुंबई : भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपयांच्या तब्बल नऊ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या असून या प्रकरणी पश्चिम उपनगरातील कॉँग्रेसचा एक पदाधिकारी हाजी इम्रान शेख, बिल्डर हालीमचंदानी व झाहीद शेख अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी दिली.केंद्र सरकारने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला ५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नव्याने बाजारात आणलेल्या दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा समाजकंटकांनी बाजारात आणल्या आहेत. त्याविरुद्ध पोलिसांबरोबरच महसूल संचालनालयाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) येथील मॅकडोनाल्डच्या परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाºयांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. झडतीमध्ये त्यांच्याकडील बॅगेत पाचशे रुपयांच्या ९ लाख किमतीच्या बनावट नोटा मिळून आल्या. या तिघांनी या नोटा कोठून मिळविल्या, या रॅकेटमध्ये आणखी कोण आहेत, याचा तपास करण्यात येत असल्याचे ‘डीआरआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.हाजी इम्रान शेख हा कॉँग्रेसच्या ब्लॉक कमिटीचा जनरल सेके्रटरी आहे तर हालीमचंदानी हा बांधकाम व्यावसायिक असून त्याची उपनगरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. झाहीद शेख बनावट नोटा खपविण्यासाठी त्यांना सहकार्य करीत होता, असे सांगण्यात आले. हालीमचंदानी याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.महिन्याभरातील ‘डीआरआय’ची ही तिसरी कारवाई असून आतापर्यंत २४ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले. पहिल्या दोन कारवाईमध्ये दोन हजार रुपयांच्या प्रत्येकी साडेसात लाखांच्या नोटा पकडण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Note BanनोटाबंदीCrimeगुन्हा