नांदेड : ट्रक आणि वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनीबसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ९ ठार, तर २२ जण जखमी झाले़ ही घटना स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठासमोर शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली़. मुदखेड तालुक्यातील बारडचे गजानन शहरे यांचा ६ जून रोजी कर्नाटकातील मुंगळी येथे विवाह सोहळा होता़ भरधाव ट्रक आणि मिनीबसमध्ये धडक झाली़ यामध्ये बसमधील ९ जण ठार झाले़ मृतांमध्ये शिवाजी हरिभाऊ भोकरे (५०), मधुकर हरिभाऊ भोकरे (५८), उत्तम वामनराव शहाणे (६५), पार्वतीबाई बाबूराव गोदलवाड (४५), योगेश्वरी संजय लेमाडे (५), मथुराबाई मनोहर खराटे (४०), विजयमाला राजकुमार कोकुळे व प्रमिला मधुकर भोकरे (४५), बलविंदरसिंघ कालिया (५०) यांचा समावेश आहे़
वऱ्हाडाच्या बसला अपघात ९ ठार
By admin | Updated: June 7, 2015 03:12 IST