शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अनधिकृत एक्स्चेंजचा दहशतवाद्यांकडून वापर, भिवंडीत ९ जणांना अटक : देशभर जाळे पसरल्याचा पोलिसांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:59 IST

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे.

ठाणे : भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत दहशतवादी कारवायांमुळे मुंब्रा हे देशभरातील तपास यंत्रणांच्या रडारवर होते. मात्र, यापुढे भिवंडीचेही नाव त्या यादीत जोडले गेले आहे.सिम बॉक्सच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल्स राउट करून संबंधित व्यक्तीला जोडणा-या अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलिसांनी जवळपास १५ दिवस या प्रकरणाची तांत्रिक माहिती मिळवली. त्यानंतर, मंगळवारी एकाच वेळी भिवंडीत ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यासाठी १० अधिकारी आणि ८० पोलीस कर्मचाºयांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या कारवाईमध्ये ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ३० आरोपींवर पोलिसांना संशय आहे. ९ पैकी ८ आरोपी पाचवी ते बारावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे २१ लाख ६१ हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.नियाज अहमद मोहम्मद इब्राहिम शेख, मोहम्मद शाकीर इर्शाद अहमद मोमीन, नदीम अली शेर अली शेख, मोहम्मद उमर अजिजुर्रहेमान खान, मोहम्मद अर्शद मुमताज अहमद शेख, मोहम्मद फुजैल एजाज अहमद शेख, शमशाद अहमद इसामुद्दीन अन्सारी, फक्रेआलम मोहम्मद शाहजहान शेख आणि मोहम्मद आलिम बद्रिजमा शेख ही आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी भिवंडी येथे राहणारे असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. या धंद्यातून त्यांना महिनाकाठी प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमध्ये जगजितसिंग गरेवाल आणि मोहन भानुशाली या खासगी तंत्रज्ञांची मोठी मदत झाली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.भिवंडी येथे मे २०१७ मध्ये अशाच प्रकारची कारवाई पोलिसांनी केली होती. त्या वेळी २२ सिम बॉक्सेस आणि ४२० सिम कार्ड्स जप्त करण्यात आली होती.अनधिकृत एक्स्चेंजचे जाळे देशभरात पसरले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. भिवंडीमध्ये सुरू असलेला गोरखधंदा हिमनगाचे केवळ टोक आहे. देशभरातील मोठमोठ्या शहरांमध्ये हा उद्योग सुरू असून, त्याविषयीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या अनुषंगाने लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.महसूलचे नुकसान-परदेशातून आलेल्या कॉल्सवर सुरक्षा यंत्रणांची नजर असते. या कॉल्सची नोंद संबंधित मोबाइल कंपनीसह दूरसंचार यंत्रणेकडेही होत असते. परदेशातील कॉल्स भारतात येण्यासाठी आंतरराष्ट्रीय ‘गेट-वे’ असतो. त्यापोटी विशिष्ट कर भरावा लागतो.अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमार्फत राउट झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉल्सची कुठेही नोंद तर होतच नाही, शिवाय त्यामुळे महसूलचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.दूरसंचार यंत्रणेकडे नोंदच नाही-या कारवाईत २५ सिम बॉक्स जप्त केले. त्यामध्ये रिलायन्स, एअरटेल, बीएसएनएल, टेलिनॉर आणि आयडियाचे ४३८ सिम कार्ड्स होते.या सिम बॉक्सेसला राउटरमार्फत इंटरनेटजोडणी दिली होती. या यंत्रणेच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल्स विनापरवाना राउट करून संबंधित व्यक्तीच्या मोबाइल फोन किंवा लँडलाइन फोनला जोडले जातात.

टॅग्स :thaneठाणेArrestअटकTerrorismदहशतवादIqbal Kaskarइक्बाल कासकर