शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बाबासाहेबांच्या जीवनावर ९०० फुटाचे पेन्सील रेखाटन

By admin | Updated: October 13, 2016 21:03 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा समग्र आढावा घेणाऱ्या पेन्सीलद्वारे रेखाटन केलेल्या सात फूट उंच व ९०० फूट लांब कॅन्व्हासवर

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.13 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा समग्र आढावा घेणाऱ्या पेन्सीलद्वारे रेखाटन केलेल्या सात फूट उंच व ९०० फूट लांब कॅन्व्हासवर साकारलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांच्या हस्ते झाले.दीक्षाभूमी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात नाशिकच्या रेखाटन ट्रस्टतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र जीवन दर्शन या पेन्सीलद्वारे रेखाटलेल्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रप्रदर्शन प्रसिध्द चित्रकार अशोक नागपुरे व किशोर नागपुरे यांच्या कल्पनेतून साकारले आहे. या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर बालपण, शिक्षण, विदेशातील शिक्षण, पत्रकारिता, प्राध्यापक व वकिली व्यवसाय त्यानंतर सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील उभारलेल्या चळवळीचा समावेश आहे. काळाराम मंदिर प्रवेश, महाड येथील चवदार तळे, कोरेगाव प्रसंग, भारतीय राजघटनेचे सादरीकरण, बौध्द धर्माची दीक्षा, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले वास्तव्य, स्वत: वापरत असलेल्या वस्तू, वाहन, विविध भावमुद्रा, वंशावळ अशा विविध प्रसंगांचा समावेश आहे.रेखाटन ट्रस्टतर्फे ९०० फूट लांबीच्या कॅनव्हासवर पेन्सीलचा वापर करून ११ महिन्यांत २७ निवडक विद्यार्थ्यांनी रेखाटन केले आहे. यासाठी कॅन्व्हास, पेन्सील, खोडरबर व कोटिंगस्प्रेचा वापर केला आहे. या प्रदर्शनाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक रेकॉर्ड येथे झाली असून इतर सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड निर्माण केले आहे.