शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सात महिन्यांत ८,९०० मृत्यू, राज्यात रस्ते अपघातांत वाढ; मुंबईत घटले, पुण्यात वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 05:19 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातात १४६  ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने  घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे.

मुंबई : राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.  वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. जानेवारी ते जुलै  २०२३ या  कालावधीत  १९,७१९  अपघात झाले असून या अपघात ८,९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अपघात घटले असून पुण्यात वाढले आहेत.गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातात १४६  ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने  घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून हे अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवीत आहेत. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. 

मुंबईत ५५१ अपघात मुंबईत एकूण ४३ लाखांहून अधिक वाहने आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये ५५१ अपघात झाले असून या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला. २०२२ च्या तुलनेत अपघातात ५९० नी घट, मृत्यूंमध्ये ६४ तर गंभीर जखमींची संख्या ४९२ ने कमी आहे.

पुण्यात ७०५ अपघातपुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४९४ अपघातात १८९ लोकांचा मृत्यू झाला तर ३५२ जण जखमी झाले होते. यंदा सात महिन्यात ७०५ अपघातांत २०५ मृत्यू तर ५०२ जण जखमी झाले.

राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विविध पातळीवर काम केले जात आहे. त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. अपघातानंतर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासोबत अपघाताबाबत जनजागृतीवरही भर दिला जात आहे.-डॉ. रवींद्र सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघात