शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

८७९६ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा

By admin | Updated: June 7, 2014 22:54 IST

आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.

वाशिम: बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला रोजगार देण्याबरोबरच राज्याचे उद्योग चक्र गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्यभरात ७३ हजार ८५५ भृखंडांचे वितरण केले असून त्यापैकी आठ हजार ७९६ भूखंड वितरीत होणे बाकी असल्याचे एमआयडीसीच्या आकडेवारीवरुन दिसून येते.राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योगासारखे दुसरे सक्षम क्षेत्र नसल्याची शासनाला खात्री पटली आहे. म्हणूनच उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला भूखंड विकसित करुन त्याचे वितरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे निर्माण झाल्यास बेरोजगारांची संख्याही आपसूकच कमी होईल हा उद्देशही यामागे दडला आहे. ज्या विभागात मोठमोठे उद्योगधंदे आहेत, तेथे मोठया प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असल्याचे आकडेवारी सांगते. दुदैवाने विदर्भात एमआयडीसी क्षेत्रात मोठमोठे उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांची मोठी फौज तयार होत आहे. २0१२ मध्ये अमरावती, विभागात केवळ १६७१ उद्योगघटक कार्यरत होते. २0१३ मध्ये हा आकडा १८१0 वर पोहचला तर नागपूर विभागात २0१२ मध्ये ३0२४ आणि २0१३ मध्ये ४१७१ उद्योग घटकांची संख्या होती.अमरावती विभागातील एमआयडीसी क्षेत्रात ४९१४ भुखंड विकसित असून ३६0७ भुखंड वितरीत झाले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक उद्योग घटक अर्थात ११ हजार ७२ आहेत. येथे १९ हजार ५२७ पैकी १७ हजार ३६८ भुखंड वितरीत झाले आहेत.रोजगार निर्मितीत मात्र पूणे विभाग अव्वल आहे. ९ हजार १९८ उद्योग घटकातून तीन लाख ६३ हजार रोजगार निर्मिती झाल्याची साक्ष एमआयडीसी कार्यालयाची २0१३ मधील आकडेवारी देत आहे. अमरावती विभागातील उद्योगधंद्यांनी केवळ २३ हजार बेरोजगारांना रोजगार दिला आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रात इतर विभागाच्या तुलनेत अमरावती विभाग खूप मागास ठरत आहे.