शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:12 IST

महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटीस बजावल्या होत्या.

- पंकज रोडेकर ठाणे : महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटीस बजावल्या होत्या. या प्रकरणाचा पसारा दिवसेंदिवस वाढत असल्याने, त्याचा तपास ओडिशा पोलीस दलाकडे देण्याबाबत ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पेट्रोल पंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सर कार्ड, मदर बोर्ड, कंट्रोल की, पॅड यामध्ये फेरफार करून, ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी १७ जून २०१७ रोजी डोंबिवलीत पहिली कारवाई करून, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात ठाणे पोलिसांनी छापे टाकले. याचदरम्यान, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्थान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई केली आहे. ती करताना, ठाणे पोलिसांनी आतापर्यंत ३२ जणांना अटक केली असून, या प्रकरणी मुख्य दोषारोपपत्रासह पुरवणी दोषारोपपत्रही न्यायालयात सादर केले आहे.दरम्यान, ओडिशातून अटक केलेल्या खासगी तंत्रज्ञ डंबरूधर मोहंतो याच्या चौकशीत, ओडिशातील आणखी २२ पेट्रोल पंपांची माहिती पुढे आली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखेचे पथक सप्टेंबरमध्ये ओडिशा येथे गेले होते. ९ दिवसांनी परतताना गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत आणखी काही पंपांची माहिती पुढे आली. त्यानुसार, या पथकाने तब्बल ८६ पेट्रोल पंपांना पडताळणीसंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांनुसार, पंपधारक ठाणे पोलिसांना सहकार्य करीत आहेत. मात्र, दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने, ठाणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारीही हा तपास तेथील पोलीस दलाकडे सुपुर्द करून, महाराष्टÑातील पेट्रोल घोटाळ्याक डे गुन्हे शाखेला व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येईल, असा याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिवाळीनंतर तेथील तपास ओडिशा पोलीस दलाकडे सुपुर्द केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPetrol Pumpपेट्रोल पंप