शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

८४ वर्षांची ‘तरुण’ आजी कसते शेती; कमावते लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 09:51 IST

Agriculture: मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील गोरेगाव येथील ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे. या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून लाखोंचे उत्पन्न घेतात.तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या घरात मुले व नातवासह मनकर्णाबाई रामराव डोईफोडे या आजी राहतात.

मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे १९७२ ला आजारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याकडे पाच एकर शेती हिश्श्याला आली. मुले लहान होती, पण बिकट परिस्थितीतही त्यांनी मुलांना सोबत घेऊन कष्ट उपसले. ५ एकरांची शेती आता ३० एकरवर गेली आहे. त्या स्वतः या शेतीत आजही राबतात. आजी सुरुवातीला केळी, पपई, असे फळपिके घ्यायच्या. सद्य:स्थितीत खरीप हंगामाला कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकवितात. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही, अशा जमिनीत आजींनी केळीचे विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी २००२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले. आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवणशक्ती तीक्ष्ण आहे. त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा त्या कुठल्याही आजाराने ग्रस्त नाहीत. 

मेहनतीने कमाविले तर...मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, मेहनतीने जर कमाविले तर त्याला डागसुद्धा लागत नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. आजींचे जीवन अत्यंत संघर्षमय गेले. आयुष्यात भरपूर संकटे आली. आजींनी त्यावर मात केली. एवढेच नव्हे तर शेती करणाऱ्या आजी तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

पतीच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. त्यानंतर शेतीत स्वतःला झोकून दिले. तेव्हा ५ एकर शेती होती, आता ३० एकर आहे. मजुरांकडून काम करून घेत असताना स्वतःही त्यांच्याबरोबर काम करते. एकरी १५ क्विंटल उत्पन्न आजही घेते.- मनकर्णाबाई डोईफोडे, शेतकरी, गोरेगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला