शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: महावितरण: ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 17:48 IST

Corona Vaccination: महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मुंबई : महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये ५९ हजार ७९९ नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून स्वतः संपर्क साधला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. त्याचा लसीकरणासाठी मोठा फायदा झाला आहे. 

महावितरणमध्ये कार्यरत ७५ हजार ३२३ पैकी आतापर्यंत ५९ हजार ७९९ (७९.४ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक बारामती परिमंडलात ९१.२ टक्के तर पुणे व कोल्हापूर- ८७.८४ टक्के, कल्याण- ८५.९ टक्के, औरंगाबाद- ८४.१ टक्के, कोकण- ८२.२ टक्के, भांडूप- ८१.५ टक्के, नांदेड- ८०.९ टक्के, जळगाव- ८०.२ टक्के, अमरावती- ७७.९ टक्के, नागपूर- ७४ टक्के, अकोला- ७३.२ टक्के, नाशिक- ७३.५ टक्के, चंद्रपूर- ७१.५ टक्के, गोदिंया- ७०.४ टक्के आणि लातूर परिमंडलामध्ये ६५.९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्थानिक कार्यालयांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. 

एक महिन्यापूर्वी महावितरणमधील सुमारे ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, वीज कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामे हे आरोग्य व पोलीस विभागांप्रमाणेच अत्यावश्यक असल्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे तसेच परिमंडल समन्वय कक्षाचा दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांनी स्वतः याकामी पुढाकार घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रयत्न सुरु केले. परिणामी लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या महिन्याभरात ७९.४ टक्क्यांवर गेली आहे. तसेच आतापर्यंत ४ हजार ५८ कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे. दुसऱ्या डोससाठी निश्चित केलेल्या मुदतीनुसार लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी परिमंडल व मुख्यालय स्तरावर दैनंदिन आढावा घेण्यात येत असून या ठिकाणी चार सदस्यीय कोरोना समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांमध्ये उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. लसीकरण झालेले असले तरी सर्वच अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोविड-१९च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ग्राहकसेवा द्यावी आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी’, असे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMumbaiमुंबईmahavitaranमहावितरण