शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१५ आॅगस्ट पासून राज्यभरातील १ कोटी कंत्राटी कामगार जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:51 IST

वेतनवाढीच्या नावावर राज्यभरातील एक कोटी कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे याच्या निशेर्धात राज्य भरातील हे कामगार १५ आॅगस्ट पासून संपावर जातील असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

ठळक मुद्देपगारात केवळ ३३८ रुपयांची वाढकिमान २ हजारांची वाढ करण्याची मागणी

ठाणे - राज्यातील १ कोटी कंत्राटी कामगारांचे वेतन दुप्पट करण्याचा राज्यशासनाने केवळ धुळफेक केली असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने मंगळवारी ठाण्यात केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा अन्यथा येत्या १५ आॅगस्ट पासून राज्यभरातील तब्बल १ कोटी कंत्राटी कामगार संपावर जातील असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड आणि समितीचे समन्वयक नचिकेत मोरे यांनी दिला आहे.             ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील २३ संघटनांचे पदाधिकारीसुध्दा उपस्थित होते. मागील १० वर्षात कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. मात्र राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि तशी घोषणाही केली. मात्र प्रत्यक्षात वेतनात अवघी ३३८ रुपयांची वाढ करुन या मंडळींनी कंत्राटी कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले असल्याचा आरोप मोरे यांनी केला. या संदर्भात राज्य शासनाच्या संबधींत विभागाशी चर्चा केली असता, डीएमध्ये वाढ केल्याचे ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात वेतनात वाढ करण्यात न आल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या कामगारांच्या वेतनातमध्ये किमान २ हजार रुपयांची वाढ करण्यात यावी अशी माफक मागणी आम्ही केलेली आहे. मात्र त्याकडेही राज्यशासनाकडून दुर्लक्ष होतांना दिसत आहे. त्यामुळेच आता या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.परंतु राज्यशासनाकडून यावर तत्काळ तोडगा काढण्यात आला नाही, तर १५ आॅगस्टपासून राज्यभरात कचरा उचलला जाणार नाही, लाईट सुरु राहणार नाही, पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आदींसह इतर सेवांवरही परिणाम होऊन राज्यभरातील १ कोटी कामगार हे संपावर जातील आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शासन असेल असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड