शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

‘त्या’ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, आदेश समजताच कृषी विद्यापीठात आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 06:02 IST

7th pay commission : समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारांसह स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

दापोली (जि. रत्नागिरी) : गेली कित्येक वर्षे रखडलेल्या चारही कृषी विद्यापीठांतील प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. याबाबतचे आदेश सकाळी जाहीर हाेताच कर्मचाऱ्यांनी आनंदाेत्सव साजरा केला. चार कृषी विद्यापीठांतील प्राध्यापकांना मात्र हा निर्णय लागू केलेला नाही. कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, कृषी विद्यालये व ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा व अमरावतीतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा आदेश कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभागाचे उपसचिव सु. स. धपाटे यांनी मंगळवारी जाहीर केला.यात म्हटले आहे की, आयोगाच्या शिफारशींवरील केंद्राचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेत वेतन सुधारणा समितीची स्थापना केली. समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारांसह स्वीकारण्याचा निर्णय घेतला. इतर शासकीय कर्मचाऱ्यांसह कृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत अधिसूचित केले. प्रारंभिक वेतननिश्चितीची कार्यपद्धती ठरविली आहे. त्यानुसार कृषी विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचारी, कृषी विद्यापीठांतील संलग्न कृषी महाविद्यालये, अनुदानित कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये व कृषी विद्यापीठांतर्गत ग्रामीण शिक्षण संस्था यामधील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे.

पर्यायासाठी एक महिन्याची मुदत सुधारित वेतननिश्चितीसाठी आवश्यक विकल्प आदेश काढल्याच्या दिनांकापासून महिन्याच्या आत देण्यात यावा. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहील. लागू केलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची घातला जातो त्यातच घेतला जावा. त्याखालील मंजूर अनुदानातून भागवावा, असे यात म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीcollegeमहाविद्यालय