शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

CoronaVirus News: राज्यात काेराेनाचे ७४ हजार १०४ सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 03:45 IST

आतापर्यंत एकूण १८ लाख ८० हजार ४१६ कोरोनाबाधित असून मृतांची एकूण संख्या ४८ हजार २०९ वर गेली आहे.

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाचे ३ हजार ८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १७ लाख ५७ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर २.५६ टक्के इतका झाला आहे. सध्या ७४ हजार १०४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ७१७ बाधित रुग्णांचे निदान झाले असून ७० मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण १८ लाख ८० हजार ४१६ कोरोनाबाधित असून मृतांची एकूण संख्या ४८ हजार २०९ वर गेली आहे. सध्या राज्यात ५ लाख १२ हजार ५८७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख २ हजार ४५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.रविवारी नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ४८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित चार मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. अशी झाली मृतांची नाेंदरविवारी नाेंद झालेल्या ७० मृत्यूंमध्ये मुंबई १२, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर २, अहमदनगर मनपा २, जळगाव २, जळगाव मनपा १, पुणे ५, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ३, सोलापूर मनपा ३, सातारा १२, सांगली २, लातूर १, उस्मानाबाद ३, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा १, नागपूर मनपा ३, वर्धा २, भंडारा १, चंद्रपूर मनपा २ आणि अन्य राज्य/देशातील १ रुग्णाचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या