शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे ७ हजार कोटींची मागणी - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 19:31 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत. याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे.

उस्मानाबाद : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत. याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे. तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उस्मानाबादेत दिली.उस्मानाबाद जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी उस्मानाबादेत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला. आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली़ पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आहेत. यासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही भागात अन्न-धान्याची टंचाई भासल्यास तेथे पुरवठ्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. 

 

‘अवनी’ प्रकरणात मुनगंटीवारांची पाठराखणअवनी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखणच केली. ते म्हणाले, परिस्थितीनुसार काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मुनगंटीवार यांचा राजीनामा घ्यायला त्यांनी स्वत:  तर बंदुक हातात घेवून अवनीला ठार केले नाही ना? मात्र, ठार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्यात काही चूक झालेली असल्यास चौकशी करुन योग्य ती कारवाई करु, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस