शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

७०० चौ.फुट घरांना मालमत्ता कर माफी?, उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांची कुरघोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 06:34 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव मुंबई महापालिकेने मंजूर केलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे सांगत ठाकरे यांच्यावर एकप्रकारे कुरघोडीच केली.

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव मुंबई महापालिकेने मंजूर केलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे सांगत ठाकरे यांच्यावर एकप्रकारे कुरघोडीच केली.मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने ७०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी दिली जाऊ शकते. पालिका आयुक्तांनी यासंदर्भातील वैधानिक कार्यवाही पूर्ण करून तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई शहराचा विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीस अंतिम मंजुरी राज्य सरकार चालू महिन्यातच देईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुंबई शहर व उपनगराचा विकास आराखडा शासन मान्यतेसाठी प्रलंबित असल्याबद्दल सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.मुंबईतील मूळ निवासी असलेले कोळी, आदिवासी बांधव यांच्या गावठाणांचे आणि पाड्यांचे सीमांकन केले जात आहे. त्यात जर काही गावठाण, पाडे सुटले तर मुंबई पालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मार्चमध्ये विकास आराखडा होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.>अनधिकृत इमारती पाडणारमुंबईत अनेक इमारती अनधिकृतपणे उभ्या असून अजूनही बांधकाम सुरूच आहे, याकडे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. अशा इमारतींची एक यादीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या प्रकरणी येत्या तीन महिन्यात शोध मोहीम राबवून अशा इमारती जमीनदोस्त केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.शिवसेनेचे पक्षप्रुमखउद्धव ठाकरे यांनी500चौरस फुटापर्यंतच्याघरांना मालमत्ता कर माफ करण्याची भूमिका घेतली होती असे शिवसेनेचेसुनील प्रभू म्हणाले. त्यावर, भाजपाचे आशीष शेलार यांनी ७०० फुटाबाबतची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.>पुनर्विकासासाठी५१ टक्क्यांची सहमतीइमारतींच्या पुनर्विकासासाठीसध्या ७० टक्के रहिवाशांची सहमती लागते पण ती यापुढे५१ टक्के इतकी केली जाईल. तशी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत केली जाईल. गावठाण, कोळीवाडे, पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे