शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

७० स्थलांतरित विद्यार्थ्यांचे होणार ट्रॅकिंग

By admin | Updated: October 5, 2015 01:15 IST

ऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरु असतानाच कुटुंबाने सोलापूरातून सांगलीत स्थलांतर केले

संदीप प्रधान, मुंबई ऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरु असतानाच कुटुंबाने सोलापूरातून सांगलीत स्थलांतर केले. विजयचे शिक्षणमध्येच थांबले... वीट भट्टीत दिवसरात्र राबणाऱ्या कुटुंबातील सुमन चौथीत असताना कुटुंबाने पोटापाण्याकरिता शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमनची शिक्षणाची हौस तेथेच संपली... अशा सुमारे ७० हजार स्थलांतरित मुला-मुलींचे शिक्षण मध्येच थांबू नये याकरिता त्यांना ‘शिक्षण हमीपत्रह्ण देऊन त्यांचे सॉफ्टवेअरद्वारे ट्रॅकींग करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची योजना अमलात येऊ घातली आहे.स्थलांतरित मुलांची नोंदणी करून त्यांना ‘शिक्षण हमीपत्र’ देण्यात येणार आहे. ज्याची नोंद सरकारकडील एका सॉफ्टवेअरवर असेल. एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थीनीच्या पालकांनी स्थलांतर केले व त्याचे शिक्षण थांबले तर लागलीच ते ज्या शाळेत जात होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तशी नोंदणी करून सरकारला माहिती द्यायची आहे. विशिष्ट विद्यार्थी अथवा विद्यार्थीनी कुठे स्थलांतरित झाली ते ट्रॅकींगद्वारे शोधून काढले जाईल. असा स्थलांतरित विद्यार्थी पुन्हा शाळेत आणणे ही तो वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची जबाबदारी असेल. त्या विद्यार्थ्याचे पालक ज्या कंत्राटदाराकडे काम करीत असतील त्याचा क्रमांक मुख्याध्यापकांना देऊन विद्यार्थ्याला शाळेत आणण्याकरिता प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली.आॅनलाईन पडताळणीआतापर्यंत अशा स्थलांतरित कुटुंबाने नव्या ठिकाणी मुला-मुलीस शाळेत प्रवेश देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला वगैरे कागदपत्रे मागितली जात होती. अनेकदा स्थलांतर करताना अशी कागदपत्रे या कुटुंबाकडून गहाळ झाल्याने त्यांच्या मुलांना शाळेत पुढील इयत्तेत प्रवेश मिळत नव्हता. शिक्षण हमीपत्र दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती संगणकात नोंदली गेलेली असल्याने राज्यात कुठेही बसून त्याची पडताळणी करता येणार आहे.