शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

७० टक्के ऊर्जा कार्बनमुक्त होईल - अनिल काकोडकर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 03:19 IST

भारतासारख्या देशासाठी ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी आपल्याला अक्षय ऊर्जेची ३०पट वाढ, अणुऊर्जेमध्ये ३०पट वाढ आणि औष्णिक ऊर्जा दुप्पट करणे आवश्यक आहे.

मुंबई : जर्मनी आणि जपानसारख्या देशांनी २०२० आणि २०३०पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचा विचार केला असून अक्षय ऊर्जेच्या उत्पादनात मोठी रक्कम गुंतविली आहे. भारतासारख्या देशासाठी ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी आपल्याला अक्षय ऊर्जेची ३०पट वाढ, अणुऊर्जेमध्ये ३०पट वाढ आणि औष्णिक ऊर्जा दुप्पट करणे आवश्यक आहे. ज्यामुळे ७० टक्के ऊर्जा कार्बनमुक्त होईल, असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर म्हणाले.राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त अनिल काकोडकर यांनी हवामान संकटाबाबत ऊर्जेची गरज कशी भागवायची याविषयी नागरिकांना संदेश दिला. वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे आयोजित आॅनलाइन लॉकडाउन व्याख्यानात भारताच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीविषयी काकोडकर बोलत होते. ते म्हणाले, वाढत्या हवामान समस्यांसह, भारतासारखा विकसनशील देश एकीकडे ऊर्जा सुरक्षा आणि दुसरीकडे हवामान सुरक्षा अशा आव्हानांच्या कचाट्यात सापडला आहे.हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनेलच्या अहवालानुसार, एकविसाव्या शतकात कार्बनडायॉक्साईडचे उत्सर्जन १.५ अंशांच्या खाली राहण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण हे २०३० सालापर्यंत २०१० सालच्या पातळी खाली ४५ टक्के आणावे लागेल. २०५०पर्यंत शून्यावर आणणे गरजेचे आहे.याचा अर्थ असा आहे की जगभरातील अनेक देशांच्या विकासाचा आलेख लक्षात घेतल्यास कार्बनडायॉक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आमच्याकडे केवळ १० वर्षे शिल्लक आहेत. अणुऊर्जेच्या योगदानामुळे, कार्बन उत्सर्जनात घट होण्यासाठीची किंमत कमी केली जाऊ शकते.अकमी कार्बन ऊर्जा स्रोतांचा, विशेषत: सौर, जलविद्युत आणि जैविक ऊर्जेसारख्या नावीकरणक्षम स्त्रोतांचे प्रमाण वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य आहे; जे शून्य उत्सर्जनास मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकते.

टॅग्स :scienceविज्ञानEarthपृथ्वी