शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 21:13 IST

या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते.

यवतमाळ, दि. 14 - यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या घाटंजी येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील चोरंबा गावात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या सपना पळसकर या बालिकेच्या नरबळीप्रकरणाने यवतमाळ जिल्हा हादरला होता.  

यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.मनोज लाल्या आत्राम (19), देविदास पुनाजी आत्राम (22), यादवराव तुकाराम टेकाम (50), पुनाजी महादेव आत्राम (54), रामचंद्र गणपत आत्राम (70), मोतीराम महादेव मेश्राम (५४), यशोदा पांडुरंग मेश्राम (60, सर्व रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ) अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दुर्गा शिरभाते हिला नरबळीच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत पाच वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

यातील आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते. सपना गोपाल पळसकर (7) रा. चोरंबा या बालिकेचा 24 आॅक्टोबर 2012 रोजी दस-याच्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता घरासमोरुन अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. मृत सपनाची आई शारदा गोपाल पळसकर हिच्या फिर्यादीवरून घाटंजी पोलिसांनी प्रथम खुनाचा (३०२) व नंतर तपासादरम्यान भादंवि 363, 364, 201, 120 (ब), 34 कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनसिंग बायस यांनी या गाजलेल्या नरबळी प्रकरणाचा काटेकोर तपास करून 20 आॅगस्ट 2013 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.या खटल्यात 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता शुभांगी वीरेंद्र दरणे, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले. हे प्रकरण अंगावर शहारे आणणारे आहे. आरोपींनी तिचा खून करून प्रसाद म्हणून नरडीचे रक्त प्राशन केले होते. नंतर यातीलच होमगार्ड राहिलेल्या तिच्या नात्यातील आजीनेच सपनाच्या मारेक-याचा शोध घ्यावा म्हणून आंदोलन केले होते.