शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नवीन महाबळेश्वरमधील ६७ गावे ‘इको सेन्सिटिव्ह’, नव्याने २९४ गावांसाठी एमएसआरडीसीची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:12 IST

'Eco-Sensitive Zone: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली.

- अमर शैलामुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यातील ६७ गावे ही केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह झोन सूचीतील आहेत. तर आतापर्यंत या गिरिस्थान प्रकल्पात ५२९ गावे समाविष्ट केली असून, यातील २३७ गावे ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांचाही यात समावेश आहे.

राज्य सरकारने नव्याने मंजुरी दिलेल्या गावांमुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) महाबळेश्वर, पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील तब्बल ५२९ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली आहे. एमएसआरडीसीने यापूर्वीच नवीन महाबळेश्वर गिरिस्थानात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे.

साताऱ्यातील ५२९ गावांसाठी प्राधिकरणलवकरच हा आराखडा अंतिम केला जाणार आहे. आता २३५ गावांनजीक असलेल्या आणखी २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश केला आहे. या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४,४०४ हेक्टर म्हणजेच ९४४ चौ. किमी एवढे आहे. यापूर्वीच्या २३५ या गावांचे एकूण क्षेत्र १,१५,३०० हेक्टर एवढे आहे. या नव्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने साताऱ्यातील ५२९ गावांतील २,०९,७०० हेक्टर म्हणजेच तब्बल २०९७ चौ. किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असेल. 

जैवविविधतेला बाधा या प्रकल्पामुळे या जैवविविधतेला बाधा पोहचेल. अत्यावश्यक नसलेला हा प्रकल्प रद्द करून पर्यावरणाचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक आणि वनस्पतितज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केली आहे.  

या ६७ गावांचा समावेशजावळी तालुका - आडोशी, आगलावेवाडी, धनकवडी, दिवदेववाडी, जुंगटी, करंडी तर्फे मेढा, खिरखंडी, कुंभारगणी, कुसापूर, कुसवडे, माडोशी, मालचौंडी, मालदेव, मोळेश्वर, मामुर्डी, मेट इंदवली, मोहाट, मोरावळे, नरफदेव, निझरे, पाली तर्फे तांब, पिंपरी तर्फे मेढा, सावरत, सायली, ताकवली, तांबी, तांबी तर्फे मेढा, वाघेश्वर, वाहिटे, वासोटा पाटण - आंबावणे, आंब्रुळे, आसावळेवाडी, चाफेर, ढोकावळे, डिचोळी, घाणाव, गोकुळ तर्फे हेळवाक, हुंबरवाडी, काळकेवाडी, कावरवाडी, मालोशी, मणेरी, मार्लोशी, मसतेवाडी, मिरगाव, नाटोशी, नावडी, नवजा, पुनवळी, रुवळे, शिरशिंगे, तळीये, तोंडोशी, तोरणे, झाडोळी, झाकडे. सातारा- आगुडेवाडी, आकले, भांबावळी, चिंचणी, गोगावळेवाडी, जोतिबाचीवाडी, कामठी, पाटेघर, वेळे, येवतेश्वर 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान