शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाणीसाठा, विदर्भात परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 04:40 IST

राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के (७८७ मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा शिल्लक होता.

विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के (७८७ मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा शिल्लक होता.राज्यात १ जून ते ११ सप्टेंबरअखेर ७८७ मि.मी. पावसाची नोंद झालीे. हा पाऊस सरासरीच्या ७७.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या ८५.४ टक्के एवढा झाला होता. सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, पुणे, बीड, उस्मानाबाद या सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, लातूर, बुलढाणा, नागपूर या बारा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला. जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पाऊस; यवतमाळ जिल्ह्यात २६ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात ६६.८८ आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ६८.२३ टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवषीर्चा साठा पुढीलप्रमाणे- मराठवाडा-५०.०५ टक्के (३५.५७), कोकण-९४.३२ टक्के (९२.१२), नागपूर-३५.१५ टक्के (५८.४४), अमरावती-२६.७७ टक्के (६५.८२), नाशिक-७४.९८ टक्के (७१.५८) आणि पुणे-८६.१०टक्के (८०.६५).राज्यात ३०२ टँकर्स सुरूराज्यातील ३१२गावे आणि १५०४ वाड्यंना आजअखेर ३०२ टँकर्समार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत १४४ गावे आणि ६८० वाड्यांसाठी २०४ टँकर्स सुरू होते. टिंचाईग्रस्त गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

टॅग्स :WaterपाणीDamधरण