शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

६७ परीक्षांच्या तारखा जाहीर, २३ मार्चपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 03:58 IST

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उशिरा का होईना, अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकानुसार टीवायबीए जर्मन स्टडीजची २३ मार्चला पहिली परीक्षा सुरू होईल.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उशिरा का होईना, अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकानुसार टीवायबीए जर्मन स्टडीजची २३ मार्चला पहिली परीक्षा सुरू होईल.या आधी मार्च महिना उलटला, तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. त्यामुळे पदवी व पदविका अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमधूनही रोष व्यक्त होऊ लागला होता. अखेर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शुक्रवारी एकूण ६७ परीक्षांच्या तारख्या जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या, तरी हिवाळी परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. विधि अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. याच निकालांच्या गडबडीत प्रशासनाने उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर लागल्याची माहिती आहे.दरम्यान, परीक्षा सुरू होण्याच्या तारखा प्रशासनाने जाहीर केल्या असल्या, तरी त्यांचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.वेळापत्रक खालीलप्रमाणे...अभ्यासक्रम तारीखटीवायबीए जर्मन स्टडीज २३ मार्चटीवायबीए इंट्रीग्रेटड स्टडीज २६ मार्चएमए इन इंग्रजी ३ एप्रिलएलएलएम (पहिले सत्र) ११ एप्रिलटीवायबीए (सहावे सत्र) १२ एप्रिलएम. ए. (पहिले सत्र) १८ एप्रिलटीवायबीए (पाचवे सत्र) २६ एप्रिलयंदा परीक्षांसह निकालही वेळेतपरीक्षा वेळेवर सुरू करून, परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी महाविद्यालये व शिक्षकांनी मूल्यांकनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे. या वेळी सीएची परीक्षा २ मे ते १७ मे या दरम्यान असल्याने, या कालावधीत परीक्षा न ठेवण्याची काळजीही घेण्यात आलेली आहे.- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक-परीक्षा व मूल्यमापन मंडळ

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थी