शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात १८ वर्षांत १५६२९, तर ९ महिन्यांत मराठवाड्यात ६७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 02:18 IST

जानेवारी २००१ ते आॅक्टोबर २०१८ या १८ वर्षांत विदर्भातील १५ हजार ६२९ शेतक-यांनी तर मराठवाड्यात जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत ६७४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

मुंबई : जानेवारी २००१ ते आॅक्टोबर २०१८ या १८ वर्षांत विदर्भातील १५ हजार ६२९ शेतक-यांनी तर मराठवाड्यात जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत ६७४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.परभणीचे आमदार राहुल पाटील, लातूरचे त्र्यंबकराव भिसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरात मंत्री पाटील म्हणाले की, विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये जानेवारी २००१ ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत विविध कारणांमुळे १५ हजार ६२९ आत्महत्या झाल्या. ७००८ प्रकरणे पात्र ठरली.८४०६ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. २१५ प्रकरणे चौकशीमुळे प्रलंबित असून पाच आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखाची मदत करण्यात आली आहे.मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त ६७४ शेतकºयांपैकी ४४५ प्रकरणेपात्र ठरली असून त्यांनाही प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत केली आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारी तेसप्टेंबर २०१८ या काळात ७३ आत्महत्या झाल्या. त्यापैकी १७ प्रकरणे पात्र ठरली. त्यांना प्रत्येकी १ लाखाची मदत देण्यात आली. तसेच कोल्हापूरमध्ये २००४ ते जून २०१८ या कालावधीमध्ये ११३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.नियम शिथिल करण्याचे विचाराधीन नाहीआत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुुंबीयांना आर्थिक मदत देण्यासह अपात्र ठरलेली प्रकरणे पात्र करण्यासाठी नियम शिथिल करण्याची कोणतीही बाब सरकारच्या विचाराधीन नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरी