- राजरत्न सिरसाटअकोला : कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत ६५ टक्के कापूस शेतकºयांकडे पडून आहे. बाजारात आजमितीस ११४.१८ लाख गाठी कापूस विकण्यात आला आहे. सध्या बाजारात ५,५०० रुपये दर आहेत. हे दर कमी असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.यावर्षी प्रतिकूल परिस्थिती असताना राज्यातील शेतकºयांनी ४१ लाख हेक्टरवर कापूस पेरणी केली; परंतु पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम कापूस उत्पादनावर झाल्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. असे असले तरी यावर्षी ३ कोटी २५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा कापूस व्यापाºयांचा अंदाज आहे. आतापर्यंत देशात १ कोटी १४ लाख १८ गाठी कापूस शेतकºयांनी विकला आहे. म्हणजेच आतापर्यंत ३५ टक्केच कापूस बाजारात आला असून, ६५ टक्के कापूस शेतकºयांकडेच आहे.यात सर्वाधिक २५ लाख ८६ हजार गाठी गुजरातमध्ये खरेदी झाल्या आहेत. त्याखालोखाल महाराष्टÑामध्ये २५ लाख १३ हजार, हरियाणामध्ये १२ लाख ६३ हजार, पंजाब ४ लाख ७७ हजार, तेलंगणामध्ये ११ लाख १३ हजार, मध्य प्रदेशात ११ लाख ५५ हजार, राजस्थानमध्ये १४ लाख ६२ हजार गाठींची खरेदी झाली, तसेच हरियाणात ११.५० लाख, कर्नाटकात ४ लाख ६७ हजार तर आंध्र प्रदेश ३.७३ लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला.
६५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच!; दर ५,५०० रुपये; दरवाढीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 23:25 IST