आविष्कार देसाई - अलिबाग
नवीन वर्षामध्ये बोहल्यावर चढण्याचा विचार करताय, तर मग बिनधास्त चढा. कारण 2क्15 मध्ये लग्नकार्याचे तब्बल 6क् मुहूर्त आहेत. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स, कॅटरिंग, ट्रान्सपोर्ट, फुलवाले आणि विशेष म्हणजे लग्न लावणा:या पुरोहितांची चलती होणार आहे. शिवाय भरगच्च मुहूर्तामुळे त्यांची लगीन घाई उडण्याचीही शक्यता आहे.
लगA म्हटले की वर पक्ष असो वा वधू पक्ष अखेरच्या क्षणार्पयत दोघांचीही धावपळ सुरूच असते. येणा:या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी दोघांनाही अपार मेहनत घ्यावी लागते. पुरोहितांचा मान निराळाच. नवी पिढी पौरोहित्याबाबत फारशी उत्साही दिसत नसल्याने त्यांची संख्या दिवसेन्दिवस कमी होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पुरोहितांनाच मुहूर्त साधताना कसरत करावी लागत आहे. ब:याचदा त्यांना एका दिवशी चार ते पाच लगA लावण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे पुरोहितांना 2क्15 मध्ये चांगलीच मागणी वाढणार आहे. लग्नासाठी आवश्यक असणारी सभागृहे रायगड जिल्ह्यात मोजकीच असल्याने त्यांचे बुकिंग ठरवूनच मुहूर्ताशी सांगड घालावी लागणार आहे. कॅटरींगवाले, मंडप डेकोरेटर्स, डिजे सिस्टीम, हारफुल वाले, वाजंत्री वाले, घोडेवाले, ट्रान्सपोटवाले यांची तर चंगळ होणारच आहे. परंतु त्यांनाही सेवा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात लग्नापेक्षा हळदी समारंभ मोठय़ा उत्साहाने साजरा करण्याची पध्दत आहे. हळदीला उपस्थित राहणा:यांचे प्रमाण अधिक असते.
2क्15 मधील लग्नमुहूर्त
जानेवारी: 24, 25, 26, 29 असे चार मुहूर्त आले आहेत. फेब्रुवारी : 8, 9, 1क्, 11,12, 13, 15, 21, 22, 23, 26, 27 असे 13 मुहूर्त,
मार्च : 4, 7, 9, 12, आणि 17 असे पाच मुहूर्त , एप्रिल : 21, 27, 28, 3क् चार मुहूर्त, मे : 2, 6, 7, 8, 9, 11, 14, 15, 27, 28, 3क् असे एकूण 11 मुहूर्त, जून : 2, 4, 6, 7, 11, 12 असे सहा मुहूर्त, नोव्हेंबर : 24, 26 आणि 27 असे तीनच मुहूर्त, डिसेंबर : 4, 6, 7, 8, 14, 15, 16, 2क्, 21, 24, 25, 27, 3क्, 31 तारखेला असे एकूण 14 मुहूर्त.
(14 जुलै ते 3क् सप्टेंबर या कालवाधीत सिहंस्थ पर्व असल्याने एकही मुहूर्त नाही)