शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्यांना ६ महिने बालसंगोपन रजा

By यदू जोशी | Updated: May 29, 2018 05:28 IST

राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाºयांची मोठी मागणी मंजूर होण्याची चिन्हे आहेत. हजारो महिला कर्मचाºयांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला

यदु जोशी मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाºयांची मोठी मागणी मंजूर होण्याची चिन्हे आहेत. हजारो महिला कर्मचाºयांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला असून, लवकरच त्याला मंजुरी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात महिला कर्मचाºयांचे प्रमाण २५ टक्के (सुमारे ४ लाख) इतके आहे. त्यांना सध्या केवळ सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळते आणि ती दोन अपत्यांपर्यंत दिली जाते. मात्र, बालसंगोपन रजा दिली जात नाही.केंद्रीय कर्मचाºयांना दोन वर्षांची पगारी बालसंगोपन रजा दिली जाते आणि ती सलग वा टप्प्याटप्प्याने वापरता येते.केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाºयांनाही रजा मिळावी, अशी कर्मचारी, अधिकारी संघटनांची जुनी मागणी आहे. ती तशीच मान्य होणार नसली, तरी सहा महिन्यांसाठी पगारी रजा दिली जाईल. मूल १८ वर्षे वयाचे होईपर्यंत ही रजा सलग वा टप्प्याटप्प्याने वापरता येईल. दोन मुलांसाठी ती दोन वेळा मिळेल, तर दत्तक मुलामुलींच्या पालक महिला कर्मचाºयांनाही या निर्णयाचा लाभ दिला जाणार आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविल्याचेही सूत्रांनी सांगितले.पुरुषांनाही मिळणार रजामहिला कर्मचाºयांबरोबरच जे पुरुष कर्मचारी एकल पालक आहेत, त्यांनाही सहा महिन्यांची बालसंगोपन रजा दिली जाणार आहे. पत्नीचे निधन, घटस्फोट आदी कारणांनी पालक एकल असू शकतात. अशा वेळी बालसंगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.