शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून ६ ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:14 IST

राज्यभरात अनेक ठिकाणी रविवार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ आणि सोलापूरमध्ये वीज पडून सहा जण ठार, तर पाच जण जखमी झाले.

यवतमाळ/सोलापूर - राज्यभरात अनेक ठिकाणी रविवार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ आणि सोलापूरमध्ये वीज पडून सहा जण ठार, तर पाच जण जखमी झाले.यवतमाळमध्ये दुपारी वादळ, पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने वेणी व वाकोडी शिवारात काही शेतकरी आणि शेतमजूर एका निंबाच्या झाडाखाली थांबले होते. तेथे अचानक वीज कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. साडेतीनच्या सुमारास महागाव तालुक्याच्या वेणी (वाकोडी) शिवारात ही घटना घडली. प्रभू नारायण जाधव (४५), पंडित दिगांबर हरणे (३०), अनिल विष्णू सगरुळे (२५), लक्ष्मण रमेश चोपडे (१८) अशी मृतांची नावे आहेत.अक्कलकोट शहर व तालुक्याला रविवारी गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. सायं. पाचच्या सुमारास वीज कोसळून चिंचोळी (न.) येथील अलाउद्दीन दसगीर बेनुरे हा शेतकरी ठार झाला. बेनुरे हे शेळ्या चरण्यास घेऊन गेले असता ही दुर्घटना घडली. सायंकाळी सांगोला तालुक्यातील काशिदवाडी येथे वीज पडून बाळासाहेब सावंत (५०) यांचा मृत्यू झाला.पुढील दोन दिवस पावसाचा अंदाजयवतमाळ आणि नांदेड येथे रविवारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला़ पुढील दोन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजहवामान विभागाने व्यक्त केला आहे़

टॅग्स :Deathमृत्यूnewsबातम्या