शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

५,७११ पोलिस ‘डीजी लोन’च्या प्रतीक्षेत; हक्काचे घर कधी होणार?

By सुमित डोळे | Updated: June 8, 2025 08:47 IST

Maharashtra Police News: पोलिस सेवेत कार्यरत असताना स्वतःचे हक्काचे घर असावे, ही प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याची अपेक्षा असते. याच आशेने शासनाच्या ‘डीजी लोन’ (गृहबांधणी अग्रिम) योजनेसाठी राज्यातील ५ हजार ७११ पोलिस कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु, ऑगस्ट २०२३ पासून योजनेची प्रक्रियाच रोखण्यात आलेली आहे. त्यामुळे १,७६८ कोटींचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत.

- सुमित डोळेछत्रपती संभाजीनगर - पोलिस सेवेत कार्यरत असताना स्वतःचे हक्काचे घर असावे, ही प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याची अपेक्षा असते. याच आशेने शासनाच्या ‘डीजी लोन’ (गृहबांधणी अग्रिम) योजनेसाठी राज्यातील ५ हजार ७११ पोलिस कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु, ऑगस्ट २०२३ पासून योजनेची प्रक्रियाच रोखण्यात आलेली आहे. त्यामुळे १,७६८ कोटींचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. परिणामी, पोलिसांना हक्काचे घरच बांधण्याचे स्वप्न कधी पूर्ण करता येईल, असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांना सहज गृहकर्ज उपलब्ध करून त्यांच्या घर उभारणीसाठी ‘डीजी लोन’ संकल्पना राबविण्यात येते. ही योजना थांबविण्यात आल्याने याचा परिणाम पोलिसांच्या आर्थिक नियोजनावर होत आहे.

बेसिक वेतनाच्या १२५ पट मिळते कर्जपोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बेसिकच्या १२५ पट कर्ज रक्कम मंजूर होते. यात कर्ज रकमेप्रमाणे व्याजदर ठरतो. विशेष म्हणजे, ही सर्व रक्कम एकरकमी जमा होते. याच्या वसुलीत कमाल २० वर्षांत प्रथम १९२ मासिक हप्त्यांत मूळ अग्रीम व नंतर ४८ मासिक हप्त्यांत व्याज वसूल करण्यात येते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

१,५५५.८७ कोटींची गरजमंत्रालयाच्या माहितीप्रमाणे महामंडळातर्फे १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ३५१८ पोलिसांच्या अर्जांसाठी १ हजार १३० कोटी ५६ लाख १७ हजार कोटींचे कर्ज उभारणीसाठी विनंती करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्राप्त १,१९३ अर्जांसाठी ४ हजार २५ कोटी १ लाख अशी एकूण ४,७११ पोलिसांसाठी  १,५५५ कोटी ८७ लाख ५६ हजार रकमेची आवश्यकता आहे. यात मुंबई पोलिस आयुक्तालयातील ७४८ प्रलंबित अर्जांसाठी २१२ कोटी २० लाखांची रक्कम आवश्यक आहे. अशा एकूण १,७६८ कोटींच्या मान्यतेसाठी विनंती अद्याप शासन दरबारी प्रलंबित आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र