लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लॉटरी लागली असून, त्यासाठी बँकेत कराची रक्कम भरण्यास सांगून ५७ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या व्यक्तीविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जरीमरी नगरातील गायकवाड चाळीत राहणाऱ्या एका महिलेच्या पतीच्या मोबाइलवर २४ मे रोजी मोबाइलवर फोन आला. राज मल्होत्रा याने महिलेला तुम्हाला १२ लाख ८० हजार रपयांची लॉटरी लागली आहे. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला कर भरावा लागेल, असे त्याने तिला सांगितले. कराची रक्कम भरण्यासाठीपैशांची मागणी करण्यात आली. त्यानुसार महिलेने ५७ हजार ८०० रुपये मल्होत्राच्या बँक खात्यात जमा केले. दीड महिना होऊनही लॉटरीची रक्कम व भरलेले पैसे न मिळाल्याने महिलेने कोळसेवाडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मल्होत्राविरोधात गुन्हा नोंदवला.
लॉटरीच्या नावाखाली ५७ हजारांचा गंडा
By admin | Updated: July 12, 2017 03:47 IST