शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:14 IST

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरून वाद विकोपाला गेल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी चिल्यापिल्यांसह धान्य, कपड्यांसह बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. ही कुटुंबे मजल-दरमजल करत शुक्रवारी सकाळी गडचिरोलीत दाखल झाली. मुख्य चौकात निषेध सभा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचविणारी ही घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली.

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.चामोर्शीपासून १५ किलोमीटर अंतरावरील नवरगाव हे ६६६ लोकसंख्येचे गाव. येथे सर्व लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात.   वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, ग्रामसभेने अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाने तीव्र रोष व्यक्त करत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. 

ग्रामसभेत ठराव घेऊनच फलकांबाबतचे निर्णय घेतले आहेत. सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरही ग्रामसभेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अशोभनीय आहे. गावात सलोखा राहावा, हीच आमची भूमिका आहे. - खुशाल कुकडे, सरपंच, नवरगाव

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली