शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

विदर्भातील ५५ टक्के आत्महत्या मदतीला अपात्र

By admin | Updated: June 21, 2016 04:06 IST

राज्य शासनाने शेतकरी आत्महत्यांबाबतही निकषांची चौकट आखल्याने तब्बल ५५ टक्के आत्महत्या पात्र-अपात्रतेच्या जंजाळात अडकल्या आहेत.

प्रदीप भाकरे,  अमरावतीराज्य शासनाने शेतकरी आत्महत्यांबाबतही निकषांची चौकट आखल्याने तब्बल ५५ टक्के आत्महत्या पात्र-अपात्रतेच्या जंजाळात अडकल्या आहेत. गत साडेपंधरा वर्षांत विदर्भातील सहा जिल्ह्यांत एकूण १२ हजार ७७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तथापि त्यापैकी ५५८० शेतकरी आत्महत्या या शासकीय मदतीच्या निकषाला पात्र ठरल्यात.विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोल्यासह वर्धा या सहा जिल्ह्यांत २००१ पासून शेतकरी आत्महत्यांचे दुर्दैवी सत्र सुरू झाले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांना भेट देऊन ‘पीएम पॅकेज’ घोषित केले. त्या पाठोपाठ ‘सीएम पॅकेज’ही आले आणि सोबतच आली मदतीसाठी पात्र-अपात्र ठरविणारी पद्धत. तहसीलदारांच्या अहवालावरून आत्महत्या पात्र-अपात्र ठरू लागल्या.गळफास घेऊन, विषाचा घोट घेऊन आणि प्रसंगी आत्मदहन करून स्वत:ला संपविणाऱ्या शेतकऱ्यांनंतर त्यांंच्या कुटुंबीयांची मात्र यात फरफट झाली. सन २००१ पासून १२ हजार ७७० शेतकरी आत्महत्यांची सरकार दरबारी नोंद असली, तरी त्यापैकी ५५ टक्के अर्थात ७,०४० आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.