शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला लागले 55 लाख मे. टन सिमेंट! एवढ्यात काय काय बांधता आले असते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 07:46 IST

महाराष्ट्राच्या अर्थकारणात गेम चेंजर ठरू शकणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने...

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादकखाद्या पायाभूत प्रकल्पाच्या उभारणीची घोषणा झाली की हा प्रकल्प हवाच का, काय गरज आहे त्याची इथपासून प्रस्तावित प्रकल्पाच्या फायद्या- तोट्याच्या गणितापर्यंतची चर्चा सर्व स्तरावर सुरू होते. सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होतो. विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारला प्रकल्पग्रस्तांसाठी विविध सवलतींची घोषणा करावी लागते. यथावकाश पायाभूत प्रकल्प मार्गी लागतो. त्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती पाहून मग त्याची वाहवा सुरू होते. अगदी अशीच कथा आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाची. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या लांबीच्या भव्यदिव्य द्रुतगती महामार्गाची उभारणीच झाली नव्हती. त्यामुळे २०१५ मध्ये जेव्हा समृद्धी महामार्गाच्या उभारणीची घोषणा झाली तेव्हापासून हा प्रकल्प चर्चेत राहिला. ७०१ किमी लांबीचा हा द्रुतगती मार्ग देशातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. 

दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणारा महाराष्ट्र शासनाचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेरीस मार्गी लागला आहे. या द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी विक्रमी असे बांधकाम साहित्य लागले. 

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरसमृद्धी महामार्गामुळे देशात महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. सर्वाधिक लांबीचे द्रुतगती महामार्ग असलेल्या राज्यांच्या पंक्तीत महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर असेल. याआधी महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर होता.

पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. उत्तर प्रदेशात १,३९६ किमी लांबीचे आठ द्रुतगती महामार्ग आहेत. महाराष्ट्रात समृद्धी महामार्गामुळे आता ८१२ किमी लांबीचे दोन द्रुतगती महामार्ग असतील.  

किती साहित्य लागले? ५५,४९,०६० मेट्रिक टन सिमेंटतुलनाच करायची झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट आणि स्टील वापरल्यास शेकडो पाच ते सात मजली इमारती उभारल्या जाऊ शकतात.  समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी 

३६,३२१ मजुरांनी घाम गाळला. त्यातील बहुतांशी कामगार परराज्यातील होते, हे विशेष. 

७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ टप्प्यांत विभागण्यात आले.  एकाच कंपनीकडे एवढ्या मोठ्या महामार्गाच्या उभारणीचे कंत्राट देणे इष्ट ठरले नसते म्हणून हा निर्णय घेण्यात आला.   

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग