शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

५३ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 16:13 IST

सक्करदरा पोलिसांनी एका कारमधील तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून ५३ लाख, ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - सक्करदरा पोलिसांनी एका कारमधील तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून ५३ लाख, ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. ताजबाग परिसरातून एका कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड नेली जाणार असल्याची माहिती सक्करदरा पोलिसांना बुधवारी रात्री मिळाली. त्यावरून पोलिसांनी ताजबाग परिसरात नाकेबंदी केली. रात्री ९च्या सुमारास त्यांना पांढ-या रंगाची हुंडाई कार (एमएच ३१/ सीएन ९०२७) येताना दिसली. मात्र, समोर पोलीस दिसताच कारचालकाने वळण घेऊन वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तयारीत असलेल्या पोलिसांनी चारही दिशेने घेराबंदी करून कारचालकाला तुकडोजी मार्गावरील वैरागडे हॉस्पिटलजवळ रोखले. कारमध्ये श्रवणकुमार सुब्रमण्यम (वय ४७, रा. हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, नागपूर), मनोज भाऊराव पारवे (वय ४१, हरिजन कॉलनी, बेझनबाग) आणि विठ्ठल वसंंतराव चालवंत (वय ३९, रा. नवीन फुटाळा अंबाझरी ) बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारची तपासणी केली असता त्यात चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून असलेल्या या नोटा कुठून आणल्या, कुठे नेणार होते, त्याबाबत हे तिघेही समाधानकारक उत्तरे देत नव्हते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आढळल्याची माहिती कळताच पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी सक्करदरा ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली.प्रकरण प्राप्तिकर खात्याकडेपोलिसांनी मशिन मागवून मध्यरात्रीपर्यंत नोटा मोजल्या तेव्हा ही रोकड ५३ लाख, ४४ हजार, ५०० रुपयांची भरली. या नोटा कुठून आणल्या ते पहाटेपर्यंत स्पष्ट झाले नाही. संबंधित तिघेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पाहून पोलिसांनी गुरुवारी सकाळी हे प्रकरण प्राप्तिकर खात्याकडे सोपविले. परिमंडळ चारचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रवींद्र कापगते, ठाणेदार आनंद नेर्लेकर आणि त्यांच्या सहका-यांनी ही कामगिरी बजावली.