शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन सत्रांत ५१ हजार ६५० कर्मचाऱ्यांना लस, दिवसभरात १८,१६६ लाभार्थ्यांनी घेतला डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 07:16 IST

राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवारी - बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात बुधवारी सर्वाधिक लसीकरण ठाणे जिल्ह्यात झाले असून, हे प्रमाण ७७ टक्के आहे.

मुंबई : राज्यात बुधवारी २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचे प्रमाण ६८ टक्के आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ३१२ जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली असून, आतापर्यंत एकूण ८८१ जणांना ही लस देण्यात आली.राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवारी - बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात बुधवारी सर्वाधिक लसीकरण ठाणे जिल्ह्यात झाले असून, हे प्रमाण ७७ टक्के आहे. ठाण्यात एकूण १ हजार ७७४ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर त्याखालोखाल मुंबईत १ हजार ७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे, हे प्रमाण शहरात ६१ आणि उपनगरात ८२ टक्के इतके आहे. पुण्यात १ हजार १०९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असून हे प्रमाण ३८ टक्के आहे. राज्यातील काही केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते, अशी माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.

लसीकरणाची आकडेवारी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी आणि टक्के) :अकोला (२२४, ७५ टक्के), अमरावती (५५८, ११२ टक्के), बुलडाणा (४५८, ७६ टक्के), वाशिम (२२१, ७४ टक्के), यवतमाळ (३६३, ७३ टक्के), औरंगाबाद (३१०, ३१ टक्के), हिंगोली (२१४, १०७ टक्के), जालना (२७९, ७० टक्के), परभणी (२८४, ७१ टक्के), कोल्हापूर (७७८, ७१ टक्के), रत्नागिरी (२९०, ५८ टक्के), सांगली (४३५, ४८ टक्के), सिंधुदुर्ग (१७९, ६० टक्के), बीड (३५८, ७२ टक्के), लातूर (४७३, ७९ टक्के), नांदेड (३२३, ६५ टक्के), उस्मानाबाद (२४०, ८० टक्के), मुंबई (६६६, ६१ टक्के), मुंबई उपनगर (१०६२, ८२ टक्के), भंडारा (२४१, ८० टक्के), चंद्रपूर (४३२, ७२ टक्के), गडचिरोली (१८५, ४६ टक्के), गोंदिया (२२३, ७४ टक्के), नागपूर (९२१, ७७ टक्के), वर्धा (५४३, ९१ टक्के), अहमदनगर (६८३, ५७ टक्के), धुळे (३६६, ९२ टक्के), जळगाव (५२३, ७५ टक्के), नंदुरबार (३१३, ७८ टक्के), नाशिक (९३२, ७२ टक्के), पुणे (११०९, ३८ टक्के), सातारा (८४०, ७६ टक्के), सोलापूर (८६९, ७९ टक्के), पालघर (५५८, ९० टक्के), ठाणे (१७७४, ७७ टक्के), रायगड (१३९, ३५ टक्के). 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं